शहाद्यात विस्कळीत घडी बसविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 12:53 PM2020-05-21T12:53:57+5:302020-05-21T12:54:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहर कोरोना मुक्त झाल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये काही ...

Attempt to put a broken clock in the martyrdom | शहाद्यात विस्कळीत घडी बसविण्याचा प्रयत्न

शहाद्यात विस्कळीत घडी बसविण्याचा प्रयत्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहर कोरोना मुक्त झाल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये काही नियम शिथिल करून शहराची विस्कळीत झालेली घडी बसवण्याचा प्रयत्न केला जात असताना शासनाचे नियम धाब्यावर बसून, शहरातील मेन रोडवर असलेल्या कापड विक्री करणाºया व्यवसायिकांनी फज्जा उडवविला आहे. याबाबत प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी आहे.
कापड विक्री करणाºया दुकानांमध्ये कोणत्याही प्रकारचे नियम न बाळगता ग्राहकांमध्ये अंतर न ठेवता गर्दी केली जात आहे. नियमाप्रमाणे दुकानांमध्ये केवळ पाच ग्राहकच घेणे बंधनकारक असताना एकाच वेळी ४० ते ५० ग्राहकांना प्रवेश दिला जात आहे. ही गंभीर बाब असून, या होणाºया गर्दीमुळे पुन्हा शहादा शहर हे कोरोनाच्या विळख्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुकानात त्यांनी कोणत्याही प्रकारचे निर्जंतुकीकरण करणारे औषध ठेवलेले नाही. केवळ ५६ दिवस दुकाने बंद होती. सवलत मिळाल्याने केवळ पैसा कमवणे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवला जात आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नसून, वाजवी पेक्षा जास्त पैसे ग्राहकांकडून घेतले जात आहे. संबंधीत अधिकाºयांनी याची तत्काळ दखल घेऊन शासनाच्या नियमाची पायमल्ली करणाºया व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी मागणी आहे.
सेल्समध्ये कपडे विक्री व्यवसाय करण्याला परवानगी दिली आहेत का हा भाग चौकशीचा असून, नगरपालिका प्रशासनाने याची दखल घ्यावी व या व्यवसायाला परवानगी असेल तर त्यांनाही नियम लागू आहेत की नाही याची चौकशी करावी. तसेच नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा अधिकार यांना दिला कोणी ही गंभीर बाब आहे. मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ, प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करावी अशी, मागणी आहे.
शहरात व्यवसाय करणाºयांसाठी नियमात शिथीलता केली आहे. परंतु भविष्यात शहराच्या दृष्टीने प्रत्येक व्यावसायिक, व्यापार अनेक उद्योजकांनी काळजी घेणे बंधनकारक आहे. दरम्यान नगरपालिका प्रशासनाने हंगाम रेडीमेड कापड दुकानावर पाच हजार रूपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाई करण्यात आल्यावरदेखील बुधवारी सेल्स कापड विक्री करणाºया दुकानदारांनी कायद्याची पायमल्ली केली आहे. मंगळवारी रेडीमेड कापड विक्री करणाºया व्यावसायिकावर ४५ हजार रूपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यापुढे कोणत्याही व्यवसायिकाने किंवा कापड विक्रेत्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यास संबंधीतांवर दंडात्मक कारवाई करीत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यामुळे संबंधितांनी नागरिकांच्या आरोग्याशी न खेळता नियमांचे पालन करून सहकार्य करावे. तसेच नागरिकांनीही प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे. अन्यथा संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
-डॉ.राहुल वाघ, मुख्याधिकारी, न.पा.शहादा

Web Title: Attempt to put a broken clock in the martyrdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.