पळासखोब्रा परिसरातील समस्यांबाबत पालकमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 12:54 PM2021-01-24T12:54:00+5:302021-01-24T12:54:07+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील वेलखेडी, सांबर व पलासखोब्रा येथे पंतप्रधान ग्राम सडक ...

Ask the Guardian Minister about the problems in Palaskhobra area | पळासखोब्रा परिसरातील समस्यांबाबत पालकमंत्र्यांना साकडे

पळासखोब्रा परिसरातील समस्यांबाबत पालकमंत्र्यांना साकडे

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील वेलखेडी, सांबर व पलासखोब्रा येथे पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत घाट सेक्शनच्या रस्त्यावर घाटातील चढाव कमी न केल्याने व आवश्यक वळणावर कटिंगदेखील व्यवस्थित करण्यात आले नाही. तसेच आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण भिंती बांधल्या नसून, या मार्गावरील कामामुळे एस. टी. बसदेखील या मार्गावरून जाऊ शकणार नाही. तसेच पलासखोब्रा गावाच्या मांडवीचापाडा, मोजरापाडा, पिपलाआडीपाडा येथे विजेची सोय नसल्याने या पाड्यांवरील नागरिकांना अंधारातच आपले जीवन जगावे लागत आहे. 
डेब्रामाळ ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या कंजाला, डेब्रामाळ, सांबर, वेलखेडी येथे सीमा मोजणीचे काम अपूर्णावस्थेत असून, गावठाण स्मशानभूमी मोजणीचे काम पूर्ववत मोजणी करून मिळावे, या सर्व मागण्या २७ जानेवारीपर्यंत न सुटल्यास २८ जानेवारी रोजी वाघदेव बुदेमालपाडा येथे बेमुदत धरणे व चूलबंद आंदोलन करण्याचे नियोजन पलासखोब्रा येथील ग्रामसभेत करण्यात आले. यासंदर्भातील निवेदन पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी, नायब तहसीलदार अजित शिंत्रे यांना दिले आहे.
तालुक्यातील व सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील वेलखेडी सांबर पलासखोब्रा येथील २०१८-१९मध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे काम सुरू असून, या घाट सेक्शनचे चढाव व वळणेदेखील कमी करण्यात येत नाहीत. तसेच आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंतीदेखील बांधल्या नसल्याने या रस्त्यावर एस. टी. महामंडळाची बस येऊ शकणार नाही. वेलखेडी, सांबर, पलासखोब्रा या रस्त्यावर दिगडबारी, साबाचापाडा, मोहाडीखेत, फाफालपाडा, बारीपाडा, आवलीपाडा या भागात वळणाचा भागदेखील कटिंग केला नसून, चारचाकी वाहनाचा टर्नदेखील लागत नाही, तर एस. टी. बस या मार्गावर कशी धावेल. घाटाचा भाग असतानादेखील चढाव कमी करण्यात आलेला नाही. आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक भिंतीसह संरक्षण कठडे नसल्याने रस्ता धोकादायक  ठरत आहे. तसेच पलासखोब्रा गावाच्या मांडवीचापाडा, मोजरापाडा, पिपलाआडीपाडा येथे विजेची सोय नसल्याने हे पाडे अद्याप  अंधारात आहेत. 
डेब्रामाळ ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या कंजाला, डेब्रामाळ, सांबर, वेलखेडी येथे सीमा मोजणीचे काम अपूर्णावस्थेत असून, गावठाण स्मशानभूमी मोजणीचे काम पूर्ववत करून मिळावे, या मागण्यांसाठी वाघदेव बुदेमालपाडा येथे बेमुदत धरणे व चूलबंद आंदोलन करण्याचे नियोजन पलासखोब्रा येथील ग्रामसभेत करण्यात आले. यासंदर्भात पालकमंत्री ॲड. पाडवी व तहसीलदार अजित शिंत्रे यांना डेब्रामाळच्या सरपंचांनी निवेदन दिले असून, या निवेदनावर रामसिंग वळवी कंजाला, भीमसिंग राज्या वळवी वेलखेडी, दिलीप कोट्या वळवी पलासखोब्रा, बटेसिग वळवी, राजेंद्र जहागीर वळवी, रमेश मोयला वळवी, सामा खात्र्या वळवी, सायसिंग रणज्या वळवी, दिवल्या सोमता वळवी, बिजला नायका वळवी यांनी दिले आहे.

Web Title: Ask the Guardian Minister about the problems in Palaskhobra area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.