शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शहादा पालिकेच्या अर्थसंकल्पास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:42 IST

शहादा नगरपालिकेच्या ऑनलाइन झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली. सभेत शहरातील महत्वपूर्ण कामांवरही चर्चा ...

शहादा नगरपालिकेच्या ऑनलाइन झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली. सभेत शहरातील महत्वपूर्ण कामांवरही चर्चा करण्यात आली. अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदींची माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी सभागृहास दिली. दैनंदिन स्वच्छता पाणीपुरवठा, पथदिवे, जलनिस्सारण, प्रधानमंत्री आवास योजना, दलित वस्ती अंतर्गत रस्ते, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध उपायोजना, मतदार अपघात विमा इत्यादीसह इतर विकास कामांकरिता १०१.३५ कोटींच्या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले .

नगरपरिषदेच्या ऑनलाइन झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. गटनेते प्रा.मकरंद पाटील यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत तसेच दररोज बाजार व आठवडे बाजार उत्पन्न वाढविण्याबाबत उपयुक्त सूचना केल्या. नगरसेवक लक्ष्मण बढे यांनी वॉर्डनिहाय खर्चाच्या तरतुदींबाबत विचारणा केली. पाणीपुरवठा सभापती शमीमबी कुरेशी यांनी सूचविलेल्या मतदार अपघात विमा उतरविण्याबाबत सभेत चर्चा झाली. उपाध्यक्षा रेखाबाई चौधरी, आनंदा पाटील व इतर नगरसेवकांनीही चर्चेत सहभाग घेतला व उपयुक्त सूचना केल्या. चर्चेअंती सर्वानुमते सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. सभेच्या मान्यतेनंतर पुढील मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्थसंकल्प पाठविण्यात येणार आहे.

शहरातील अनेक भौतिक सुविधांचा अर्थसंकल्पात समावेश आहे. अर्थसंकल्पातील तरतुदी पाहता येत्या वित्त वर्षात विकासाचे नवे पर्व पहावयास मिळेल, असे मत नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी व्यक्त केले.

यापूर्वी अशी ऑनलाइन सभा घेताना आलेल्या तांत्रिक अडचणींचा आढावा घेत त्यावर मात करून प्रथमच यशस्वीरित्या ऑनलाइन पध्दतीने नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा कामकाज हाताळण्यामध्ये अधीक्षक भाऊसाहेब देशमुख, कार्यालय पर्यवेक्षक माधव गाजरे, संगणक अभियंता मंगेश गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. लेखापाल माळोदे यांनी अंदाजपत्रकातील महत्त्वाच्या तरतुदी विशद केल्या.