शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी युवक व ज्येष्ठ नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:21 IST

तालुक्यातील सारंगखेडा येथील ग्रामपंचायत सभागृहात आरोग्य, विभाग शिक्षण विभाग, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सरपंच पृथ्वीराजसिंह ...

तालुक्यातील सारंगखेडा येथील ग्रामपंचायत सभागृहात आरोग्य, विभाग शिक्षण विभाग, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सरपंच पृथ्वीराजसिंह रावल यांच्या अध्यक्षस्थानी नियोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतीलाल पावरा, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी.एम. पाटील, आरोग्य सेवक योगेश ठाकुर, शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख वसंत जाधव आदी उपस्थित होते.

याप्रसंगी सरपंच पृथ्वीराजसिंह रावल म्हणाले की, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी शिक्षण व आरोग्य प्रशासनाने गावात वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करून लसीकरणासाठी लोकांना जागृत केले व लसीकरणामुळे होणारे फायदे आता प्रत्येक ग्रामस्थांना लक्षात आले असून, त्याचे महत्त्व कळाले आहे. त्यामुळे सगळ्या ग्रामस्थांनी एकाच वेळी गर्दी करू नये, गर्दीमुळे शिक्षण आणि आरोग्य विभागावर तणाव येत आहे. त्यामुळे लसीकरण करताना प्रत्येकाने नियमावलीचे पालन करून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले.

बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. सारंगखेडा गावासाठी आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी लसीकरण करण्यात येईल तर काही अपरिहार्य कारणामुळे लस उपलब्ध न झाल्यास लसीकरण होणार नाही. लसीकरण जिल्हा परिषद मराठी शाळा येथे होईल. लसीकरणाच्या ठिकाणी प्रत्येकाने शारीरिक अंतर ठेवून तोंडाला मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा तसेच एकाच ठिकाणी कोणीही गर्दी करू नये, सकाळी साडेसात वाजेपासून लसीकरणासाठी टोकन वाटप करण्यात येईल. आपले ओळखपत्र दाखवून कूपन घ्यावे, टोकन घेतल्याशिवाय कोणालाही लसीकरण करण्यात येणार नाही. वय वर्ष १८ व ४५ या लाभार्थ्यांसाठी वेगवेगळे स्वतंत्र चार प्रकारचे स्त्री-पुरुषांना कूपन देण्यात येतील. एका व्यक्तीला एकच कूपन मिळेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बाहेरील जिल्ह्यातील लोकांना लसीकरण करण्यात येणार नाही. ज्या दिवशी लसीकरण सुरू असेल त्या दिवसाचे शेड्यूल घेतले असेल तरच विना कूपन प्रवेश मिळेल. जिल्ह्याबाहेरील नागरिकांना शेड्यूलशिवाय लस दिली जाणार नाही. लसीकरणाच्या ठिकाणी १८ व ४५ वय असलेल्या पुरुष-स्त्रिया असे वेगवेगळे कक्ष तयार करण्यात आले आहे. सेल्फ रजिस्ट्रेशन करून लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य, शिक्षण व ग्रामपंचायत प्रशासनास लाभार्थीनी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. या बैठकीला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. शासनाने जादा लसींचा पुरवठा उपलब्ध करून दिल्यास लवकर लसीकरण पूर्ण होईल. त्यामुळे जादा लसींचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणीचा बैठकीदरम्यान करण्यात आली.