शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षित पर्जन्यमान न झाल्यास मका, तूर व बाजरी पिकाची पेरणी करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST

जिल्ह्यातील नवापूर (२८.५० टक्के), तळोदा (२७.४०) व अक्क्लकुवा (२८.८०) या तालुक्यांत कमी पर्जन्यमान झाले असून २ लाख ९५ हजार ...

जिल्ह्यातील नवापूर (२८.५० टक्के), तळोदा (२७.४०) व अक्क्लकुवा (२८.८०) या तालुक्यांत कमी पर्जन्यमान झाले असून २ लाख ९५ हजार २१९ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी१९ जुलै अखेर २ लाख १५ हजार ४५० हेक्टरवर पेरणी झालेली आहे. दरम्यान, धुळे येथील विभागीय विस्तार केंद्र व धुळे येथील महाबीजचे व्यवस्थापक यांनी आपत्कालीन पीक नियोजनासंदर्भात चर्चा करून पिकाचे नियोजन करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत. अपेक्षित पर्जन्यमान न झाल्यास ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर मूग आणि १५ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी होणार नाही असे अपेक्षित असताना त्याऐवजी शेतकऱ्यांना मका, तूर आणि बाजरीची पेरणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. भात पिकाची १५ ऑगस्टपर्यंत लावणी पद्धतीने उशिरा पाऊस झाला तरी पेरणी पूर्ण करावी. जिल्ह्यात ४-५ दिवसांत पाऊस झाल्यास विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे मका, तूर व बाजरी पिकांची लागवड करावी. खरीप पड क्षेत्र राहिल्यास त्यात ऑगस्ट उशिरापर्यंत ओवा व एरंडी पिकांची लागवड अपेक्षित आहे.

जुलै महिन्याअखेरपर्यंत अक्क्लकुवा व धडगाव तालुक्यात भगर पिकाची लागवड पूर्ण होईल असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार यांनी कळविले आहे.