नंदुरबारात पुन्हा एक कोरोना पॅझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 13:28 IST2020-06-05T13:28:39+5:302020-06-05T13:28:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबारात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. चार दिवसांपूर्वी आढळलेला व मुंबई रिटर्न ...

Another corona positive patient in Nandurbar | नंदुरबारात पुन्हा एक कोरोना पॅझिटिव्ह रुग्ण

नंदुरबारात पुन्हा एक कोरोना पॅझिटिव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : नंदुरबारात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. चार दिवसांपूर्वी आढळलेला व मुंबई रिटर्न असलेल्या रुग्णाच्या सपर्कातील अर्थात त्यांचेच ६७ वर्षीय वडिल असल्याचे स्पष्ट झाले आहे. नंदुरबारातील नागाई नगर भागात राहणाऱ्या एका ४२ वर्षीय व्यक्तीस कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांचा स्वॅब खाजगी रुग्णालयातून आला होता. त्यांना होम क्वाँरटाईन करण्यात आले होते. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर परिसर सील करण्यात येवून संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यात त्यांच्या ६७ वर्षीय वडिलांचा स्वॅब हा पॉझिटिव्ह आला आहे.
’नागाईनगरचा भाग आधीच सील करण्यात आला आहे. या रुग्णाच्या कुटूंबातील सर्व व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. केवळ वडिलांचांच स्वॅब हा पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. परिसरात आरोग्य तपासणी तसेच परिसर सॅनिटाईज करण्यात आला आहे. प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

 

Web Title: Another corona positive patient in Nandurbar