शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
अंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
4
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
5
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
6
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
7
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
8
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
9
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
10
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
11
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
12
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
13
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
14
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
15
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
16
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
17
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
19
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
20
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : पंचायत समितीची बैठक मंगळवारी घेण्यात आली होती. या बैठकीत आदिवासी विकास प्रकल्प व सामाजिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : पंचायत समितीची बैठक मंगळवारी घेण्यात आली होती. या बैठकीत आदिवासी विकास प्रकल्प व सामाजिक वनीकरण विभागास उपस्थितीचे पत्र देऊनही त्यांनी बैठकीस ठेंगा दाखविल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून पुन्हा संबंधीतांना नोटीसा बजाविण्याचे आदेश देण्यात आले.तळोदा पंचायत समितीची मासिक सभा मंगळवारी येथील पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सभापती यशवंत ठाकरे होते. याप्रसंगी उपसभापती लताबाई अर्जुन वळवी, सदस्य सोनी रोहिदास पाडवी, विजयसिंग राणा, सुपीबाई मोहन ठाकरे, सुमनबाई धर्मेंद्र ठाकरे, ईलाबाई महेंद्र पवार, चंदनकुमार पवार, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, सहायक गटविकास अधिकारी आर.बी. सोनवणे उपस्थित होते.या वेळी सर्व विभागांच्या कामकाजांचा आढावा घेण्यात येवून शासनाच्या विविध आदेशांचे वाचन करण्यात आले. त्यानंतर तळोदा तालुक्यात ज्या नळपाणी पुरवठा योजना बंद पडल्या आहेत. त्या योजनांबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याच्या सूचना संबंधीतांना देण्यात आल्या. याशिवाय प्रत्येक घराला नळ देण्यासाठी कार्यवाही करण्याची सूचनाही देण्यात आली.याप्रसंगी आदिवासी विकास प्रकल्प व सामाजिक वनीकरण विभागाचा आढावा घेण्याचा विषय आला तेव्हा या विभागातील कुणीच अधिकारी वा त्यांचे प्रतिनिधी पाठविण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीबाबत नोटीसा बजावून खुलासाही मागविण्याचे आदेश गटविकास अधिकाºयांना सभापतींनी दिले.वास्तविक त्यांना पंचायत समितीच्या मासिक सभेचे पत्र पाठविले होते असे असतांना ते उपस्थित राहीले नाही. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधीदेखील सभा संपल्यानंतर आले होते. परंतु त्यांना सभेची नियोजित वेळ एक वाजेची देण्यात आली होती. त्यामुळे उशिर झाल्याचे सूत्रांनी सांगितले. बैठकीस पंचायत समिती बांधकाम विभागाचे पवार, गवळे, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पशुसंवर्धन विभागाचे डॉ.सुनील गोसावी व इतर विभागप्रमुख उपस्थित होते.आदिवासी विकास प्रकल्प व सामाजिक वनीकरण विभागांना पंचायत समितीच्या मासिक सभेत प्रतिनिधी पाठविण्याबाबत लेखी पत्र देऊनही त्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे संबंधितांच्च्या उदासिन भूमिकेबाबत जिल्हा विकास व नियोजन समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती यशवंत रायसिंग ठाकरे यांनी लोकमतशी बोलतांना दिली. वास्तविक प्रकल्प व सामाजिक वनीकरणाच्या योजना तालुक्यातील आदिवासी जनतेशी निगडीत आहेत. या योजनां प्रकरणी लोकप्रतिनिधींकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असतात. साहजिकच त्याबाबत अडचणींचे निवारण करण्यासाठी अथवा उपाययोजनांसाठी समन्वय राखण्याकरीता पंचायत समितीच्या बैठकीत त्यांची उपस्थिती आवश्यक असते. पंचायत समितीनेदेखील तसा ठराव घेऊन त्यांना पत्रे पाठविली होती. परंतु उदासिन प्रशासनाने त्यांची अजून पावेतो कुठलीच दखल घेतली नाही. त्यांना नोटीसा बजावून खुलासा मागविण्याची सूचनादेखील अधिकाºयांना देण्यात आली आहे. जनतेच्या विकास कामांमध्ये कुणीही उदासिन धोरण घेवू नये यासाठी कडक पावले उलचण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.