मयत महिलेच्या संपर्कातील सर्व अहवाल निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 01:26 PM2020-06-02T13:26:45+5:302020-06-02T13:27:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : सोमावल खुर्द येथील मयत झालेल्या कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आलेल्या सातही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने ...

All reports of contact with the deceased woman are negative | मयत महिलेच्या संपर्कातील सर्व अहवाल निगेटीव्ह

मयत महिलेच्या संपर्कातील सर्व अहवाल निगेटीव्ह

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : सोमावल खुर्द येथील मयत झालेल्या कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आलेल्या सातही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र रविवारी रात्री नंदुरबार येथे आढळून आलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाचे तळोदा तालुक्यातील खूषगव्हान कनेक्शन समोर आल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.
तळोदा तालुक्यातील सोमवल खुर्द येथील महिलेचा २४ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. २५ मे रोजी तिच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले होते. तिची पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र दुसऱ्या चाचणीचा अहवाह २७ मे रोजी पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या कोरोनाग्रस्त महिलेच्या कुटुंबातील सात जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. या सातही जणांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. यातील काही जणांचा महिलेच्या अंत्यसंस्काराच्या वेळी जवळून संपर्क आला होता. त्यामुळे सोमवल खुर्द ग्रामस्थांचा जीव टांगणीला होता. या सातही जणांच्या कोरोणा चाचणीकडे ग्रामस्थांसह तालुक्याचे लक्ष लागून होते. रविवारी रात्री या सात जणांचे कोरोना अहवाह निगेटिव्ह आल्याने छोटा सोमावल ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु रविवारी रात्री नंदुरबार येथील कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रूग्णाच्या संपर्कात तळोदा तालुक्यातील खूषगव्हाण येथील दोन व्यक्ती संपर्कात आल्याचे समोर आल्याने प्रशासनाची पळापळ झाली. तालुका प्रशासानाकडून रात्री दोन वाजेच्या सुमारास या दोन्ही जणांसह त्यांच्या कुटुंबातील एकाला आमलाड विलगीकरण कक्षात आणण्यात आले. सध्या तरी त्यांच्यात कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून येत नसल्याचे तालुका आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आवश्यकता वाटल्यास त्यांचेदेखील स्वाब घेण्यात येणार आहेत. दरम्यान, सोमावल खुर्द येथील महिला कोरोना संशयित होती व तिचे स्वॅब घेण्यात आले असतांना तिचा मृत्यू झाल्यावर तिचा मृतदेह पाठवण्याबाबत स्थानिक प्रशासनाला कोणत्याही प्रकारची सूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे हिंगणी ता.शहादा येथील प्रकारासारखाच प्रकार घडण्याची धास्ती होती. परंतु सुदैवाने छोटा सोमावल येथील सातही जणांचा अहवाह निगेटिव्ह आल्याने प्रशासनासह ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. खुषगव्हाण येथे प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे.


नंदुरबार येथे रविवारी कोरना पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रूग्णाला पाहण्यासाठी खुषगव्हाण, ता.तळोदा येथील दोन जण गेले होते. अशी माहिती मिळाल्यानंतर त्या दोघांना व त्यांच्या कुटुंबातील एकाला आमलाड येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
- महेंद्र चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी, तळोदा

Web Title: All reports of contact with the deceased woman are negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.