शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्यात कर्मचारी बदल्यांचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST

नंदुरबार : ऐन पावसाळ्यात जिल्हा परिषदेत बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हा ...

नंदुरबार : ऐन पावसाळ्यात जिल्हा परिषदेत बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. १५ टक्के अंतर्गत सेवा ज्येष्ठतेनुसार या बदल्या होणार आहेत. समुपदेशन शिबिरात पहिल्या दिवशी पाच विभागांच्या बदल्यांसाठी शिबिर घेण्यात आले.

कोरोनामुळे गेल्या वर्षी बदल्या झाल्या नव्हत्या. या वर्षी देखील होणार नाहीत अशीच स्थिती असतांना शासनाने आदेश काढून १५ टक्के बदल्या करण्यास सांगितले. ग्राम विकास विभागाने याबाबत १४ जुलै रोजी आदेश पारित केले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने लागलीच प्रक्रिया सुरू करून समुपदेशन शिबिरेही घेण्यास सुरुवात केली आहे.

बदल्यांमध्ये केवळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत. या बदल्या राज्यस्तरावरून ऑनलाइन पद्धतीने करण्यात येतात. यंदा शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने शिक्षकांच्या बदल्याही रखडणार हे स्पष्टच आहे. त्यामुळे दुर्गम भागातील बदलीपात्र शिक्षकांना नाहक दोन वर्षांपासून त्या भागात काम करावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा शिक्षकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे शिक्षकांच्याही ऑनलाइन बदल्यांचे सत्र सुरू करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

१५ टक्के बदल्यांमध्ये जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभागांचा समावेश आहे. त्यात अर्थ विभाग, बांधकाम विभाग, लघुसिंचन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, यांत्रिकी विभाग, महिला व बाल विकास विभाग, सामान्य प्रशासन विभाग, शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख, पशुसंवर्धन, कृृषी, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग या विभागांचा समावेश आहे.

शासनाच्या आदेशानंतर लागलीच सेवाज्येष्ठेता यादी तयार करण्यात आली. त्यानंतर बदलीपात्र कर्मचाऱ्यांना शिबिरात बोलविण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्यानुसार पहिल्या दिवशी अर्थ विभाग, बांधकाम विभाग, लघुसिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा आणि यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांचे समुपदेशन झाले व बदल्या करून लागलीच आदेश पारित करण्यात आले.

समुपदेश शिबिरासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, सभापती निर्मला राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांच्यासह इतर अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करून लागलीच त्यांना स्क्रीनवर रिक्त जागा दाखविण्यात येत होत्या. त्यांच्या पसंतीक्रमानुसार जागा रिक्त असल्यास लागलीच त्या ठिकाणी त्यांना नियुक्ती देण्यात येऊन बदली ऑर्डरचीही प्रक्रिया करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.