शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

आमपाडा येथे कृषी दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

तालुका कृषी अधिकारी बापू गावीत, पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. बी. पाटील, पंचायत समितीचे कृषी अधिकारी शिरीष कोकणी, बळीराजा ...

तालुका कृषी अधिकारी बापू गावीत, पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. बी. पाटील, पंचायत समितीचे कृषी अधिकारी शिरीष कोकणी, बळीराजा कृषक मंडळ धनराटचे अध्यक्ष विशाल गावीत, आमपाडा येथील शेतकरी गुलाब गावीत, कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, तालुका पातळीवर पीक स्पर्धेत विजेते ठरलेले शेतकरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. रब्बी हंगाम २०२० मध्ये पीक स्पर्धेत भाग घेऊन विजेते ठरलेल्या शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी बापू गावीत यांनी कार्यक्रमाचा हेतू कथन करुन कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली व विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. मुरलीधर महाजन यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याविषयी माहिती दिली. डॉ. श्रीधर देसले यांनी सेंद्रिय कर्बाचा आपल्या शेतीत वापर वाढवून शेतजमिनीचे आरोग्य ठेवणे शक्य असल्याचे सांगून कांदा पिकाच्या उत्पन्नवाढीवर त्यांनी मार्गदर्शन केले. विशाल गावीत यांनी नवापूरच्या भौगोलिक मानांकन प्राप्त सुगंधी तूर पासून तूरडाळ उत्पादन व प्रक्रियेकरिता सदस्य नोंदणी, भविष्यात तूरडाळची मागणी व पुरवठा या विषयावर स्थानिक बोलीभाषेतून मार्गदर्शन केले. तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी कृषी दिनाच्या शुभेच्छा देऊन शेतकऱ्यांच्या सर्वंकष उन्नतीसाठी कृषी व महसूल विभाग समन्वय राखून प्रयत्नशील असल्याचे सांगितले. कृषी पर्यवेक्षक दिलीप गावीत यांनी आभार मानले. आमपाडा परिसरातील शेतकरी कार्यक्रमास उपस्थित होते.