न्यायालयाच्या आदेशानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल

By Admin | Updated: April 4, 2017 13:27 IST2017-04-04T13:27:36+5:302017-04-04T13:27:36+5:30

घरात घुसून युवतीचा विनयभंग केल्याची तक्रार तिच्या आईने नंदुरबार न्यायालयात दाखल केली होती़ या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने चौपाळे ता़ नंदुरबार येथील सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आह़े

After the court order, the accused filed a complaint | न्यायालयाच्या आदेशानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल

न्यायालयाच्या आदेशानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल

 नंदुरबार,दि.4- फेब्रुवारी महिन्यात घरात घुसून युवतीचा विनयभंग केल्याची तक्रार तिच्या आईने नंदुरबार न्यायालयात दाखल केली होती़ या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने चौपाळे ता़ नंदुरबार येथील सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आह़े 

12 फेब्रुवारी रोजी चौपाळे येथील 50 वर्षीय फिर्यादी महिलेजवळ जुन्या भांडणाची कुरापत काढून सुरेश अमृत भिल, अजय सुरेश भिल, बिजूबाई सुरेश भिल, कलाबाई अमृत भिल, जयंत भिल, विजय मक्कन भिल, गनाबाई मक्कन भिल यांनी भांडण करण्यास सुरूवात केली़ यादरम्यान संशयित आरोपी क्रमांक एक याने फिर्यादीच्या मुलीस शिवीगाळ करून तिला लज्जा येईल असे कृत्य केल़े तसेच तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ फिर्यादी महिलेचा मुलीचा हात धरून तिची ओढाताण संशयित आरोपींनी केली होती़ याबाबत पिडीत महिलेने न्यायालयात अर्ज देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती़ यानुसार न्यायालयाने तालुका पोलीस ठाण्याला दिलेल्या आदेशानंतर महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आह़े  

Web Title: After the court order, the accused filed a complaint