शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
अंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
4
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
5
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
6
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
7
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
8
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
9
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
10
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
11
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
12
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
13
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
14
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
15
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
16
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
17
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
19
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
20
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
Daily Top 2Weekly Top 5

१२ वर्षांनी भोंगऱ्या व होळी एकाच दिवशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : होळीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी भोंगºया बाजाराला सुरुवात झाली असली तरी परंपरेनुसार वेळ आली नसल्याने धडगावचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : होळीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी भोंगºया बाजाराला सुरुवात झाली असली तरी परंपरेनुसार वेळ आली नसल्याने धडगावचा भोंगºया यंदा लांबणीवर पडला. यंदा धडगावचा भोंगºया हा होळीच्या दिवशीच येत असून असा योग दर १२ वर्षांनी येतो. ११ वर्षांपासून होळीपूर्वी येणाºया सोमवारी भरविण्यात येत होता. त्यामुळे कालच्या सोमवारी सातपुड्यातील बांधवांची काही अंशी वाट चुकली.ब्रिटीशकालीन गौरवशाली परंपरा लाभलेल्या धडगाव येथील भोंगºयाची अवघ्या सातपुड्यातील आदिवासी बांधवांना प्रतिक्षा असते. या बाजाराला एक-दोन नव्हे तर सात पिढ्यांचा वारसाही लाभला आहे. हा बाजार दरवर्षी होलीकोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी येणाºया सोमवारी भरविला जात असतो. परंतु दर १२ वर्षांनी हा भोंगºया होळीच्याच दिवशी येतो, तसाच योग यंदा आला आहे. त्यामुळे सातपुड्यात होळीला सुरुवात झाली असली तरी भोंगºयाचा कार्यक्रम घेण्यात आला नाही.सातपुड्यात होळीला नियोजित होळीपेक्षा एक आठवडा आधिच सुरवात होते. त्यानुसार यंदा सातपुड्यात दि.३ मार्चपासूनच सुरू झाली. त्यामुळे तेथील बहुतांश आदिवासी बांधवांमध्ये दि. २ मार्च रोजी भोंगºया असल्याचा गैरसमज झाला. परंतु धडगाव येथील पराडके परिवाराच्या परंपरेनुसार नेमकी वेळ आली नाही. त्यामुळे यंदाचा भोंगºया लांबणीवर पडला आहे. होळीच्याच दिवशी भोंगºया हा योग दर १२ वर्षांनी येत असल्याचे बहुतांश आदिवासी बांधवांना माहित असले तरी काही बांधवांमध्ये अंशत: दिशाभूल झाली.नियोजित होळी ९ मार्च रोजी असून त्याच दिवशी सोमवार येत आहे. त्यामुळे ११ वर्षांपासून वेगवेगळ्या दिवशी साजरा होणारे होळी व भोंगºया हे सण यंदा एकाच दिवशी साजरी होणार आहे. धडगावला ९ मार्च रोजी पहाटे होळी पेटल्यानंतर सकाळी ११ वाजेपासून भोंगºयानिमित्त शाही मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीत पोलीस पाटील भिमसिंग पराडके, फुसा पराडके, विजय पराडके, जामसिंग पराडके, गणेश पराडके, दशरथ पराडके, खेमा पराडके, बाजिराव पराडके, शिवाजी कालशा पराडके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर धडगाव तालुक्यातील अन्य बांधवही सहभागी होणार आहे.या मिरवणुकीला जुने धडगावपासून सुरुवात होणार असून पोलीस ठाणे, वन विभागाचे कार्यालय, धडगावचा मुख्य चौकावरुन विश्रामगृहाजवळ मिरवणुकीचा समारोप होणार आहे. समारोपाच्या ठिकाणी पुंजारा जमसरर पराडके यांच्या हस्ते विधीवत पुजा करण्यात येणार आहे.ब्रिटीशांनी दिलेली सनद वार्तांकनासाठी काढली अन् झाली गहाळप्रशासकीय कामकाजासाठी सातपुड्यात येणाºया ब्रिटीशकालीन खान्देश जिल्ह्याच्या महसुल अधिकाऱ्यांना जुने धडगाव येथील पराडके परिवाराचा आधार मिळत होता. त्यामुळे या परिवाराकडे अधिकाºयांनी अनेक जबादाºया सोबविल्या. सर्व जबाबदाºया नेटाने पार पाडल्या गेल्यामुळे या परिवाराकडे अन्य काही जबाबदाºयाही देण्यात आल्या. त्यावेळी बोल्या पराडके यांना काही अधिकारही दिले गेले, त्यातच भोंगºयाचा उपक्रम राबविण्यासह अन्य अधिकारासाठी ब्रिटीशांकडून सनद देण्यात आली. भोगºया उपक्रमाच्या माध्यमातून हा उपक्रम पोलीस पाटील बोल्या पराडके यांच्यानंतर साट्या पराडके, परभा पराडके, भामटा पराडके व यंदाचे पोलीस पाटील भिमसिंग पराडके यांनी सात पिढ्यांचा वारसा पुढे नेला. मध्यंतरीच्या कालावधीत साजरा होणाºया भोंगºयाच्या वार्तांकनासाठी दिल्लीहून येणाºया हिंदी भाषीक पत्रकारांच्या माहितीसाठी ही सनद बाहेर काढली. अन् या दरम्यान ती पाटलांच्या घरातून हरवली. त्यामुळे पराडके परिवाराचे मोठे नुकसान झालेच परतु त्यांच्याकडे तलवारींशिवाय कुठलाही पुरावा शिल्लक राहिला नाही.