शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने प्रशासन सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नवापूर कुक्कुटपालन केंद्रांमध्ये पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने जिल्हा प्रशासनाने बर्ड फ्ल्यू बाबत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नवापूर कुक्कुटपालन केंद्रांमध्ये पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने जिल्हा प्रशासनाने बर्ड फ्ल्यू बाबत अलर्ट घोषित केला आहे. नवापूर  तालुक्यातील पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांचा मृत्यू चे प्रमाण वाढल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. नवापूर शहरात निनावी तक्रारी वरून चौकशी दरम्यान हजारो कोंबड्या मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले होते.  नाशिक आयुक्त कार्यलयातून  चौकशी साठी आलेल्या अधिकाऱ्यांनी मृत कोंबड्या ची व्हिलेवाट कशी लावली ती माहिती जाणून घेतली. त्यावर मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. नवापूर परिसरातील इतर कुकुटपालन केंद्रांची पाहणी व चौकशी सुरू असून नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या आदेशा नुसार आज नवापूर परिसरातील पोल्ट्री  फार्म वर नाशिक प्रादेशिक सह आयुक्त पशुसंवर्धन डॉ. बाबुराव नरवाडे, सहायक आयुक्त पशुसवरधन डॉ. शहाजी देशमुख, सहायक आयुक्त पशुसवरधन डॉ. जी. आर. पाटील, पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. बी. पाडवी, डॉ. अमित पाटील, डॉ. योगेश गावीत, डॉ. के डी पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. यु डी पाटील, पशुसंवर्धन अधिकारी नंदुरबार यांनी भेटी देऊन तपासणी केली.सील लावलेले फार्म नवापुर तालुक्यातील एकूण २५ पोल्ट्री फार्म पैकी चार पोल्ट्री सील करण्यात आहे. डायमंड पोल्ट्री फार्म, वसीम पोल्ट्री फार्म, आमलिवाला पोल्ट्री फार्म, परवेज पठाण पोल्ट्री फार्म यांचे फार्म बुधवारी रात्री उशिरापर्यंत सील करण्यात आले. यापैकी डायमंड पोल्ट्री फार्म विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रिपोर्ट येत नाही तोपर्यंत पोल्ट्री सीलनवापुर तालुक्यातील २५ पोल्ट्री फार्म पैकी चार पोल्ट्री फार्म मधून ११ पक्ष्यांचे नमुने पुणे  येथे तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहे. जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत सदर चारही पोल्ट्री फार्म मधील पक्ष्यांची ने-आण वाहतूकीवर बंदी घालण्यात आलेली आहे. नवापुर तालुक्यातील सर्व पोल्ट्री व्यवसायिकांची जिल्हा प्रशासन पशुसंवर्धन विभागाला सहकार्य करीत आहे. प्रांताधिकारी यांनी पोल्ट्री व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या योग्य ते मार्गदर्शन केले. अशी माहिती पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष आरीफभाई बलेसरीया यांनी दिलीदोन दिवसात चार हजार कोंबड्याचा मृत्यूबधुवारी १ हजार २८९ कोंबड्याचा मृत्यू झाला तर गुरूवारी २ हजार ६५५ गेल्या पंधरा दिवसांमध्ये नवापूर तालुक्यातील काही पोल्ट्री फॉर्म मध्ये २० ते २२ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. पण सदर ठोस पुरावे आम्हाला आढळून आले नाही असे त्यांनी सांगितले.