सहा लग्न आयोजकांवर तीन महिन्यांत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:28 IST2021-05-22T04:28:59+5:302021-05-22T04:28:59+5:30

नंदुरबार : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लावण्यात आलेली संचारबंदी आणि निर्बंधाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यात सहा लग्न आयोजकांवर कारवाई करण्यात आली ...

Action on six wedding organizers in three months | सहा लग्न आयोजकांवर तीन महिन्यांत कारवाई

सहा लग्न आयोजकांवर तीन महिन्यांत कारवाई

नंदुरबार : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लावण्यात आलेली संचारबंदी आणि निर्बंधाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यात सहा लग्न आयोजकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात नंदुरबारात चार तर शहाद्यात दोन आयोजकांचा समावेश आहे. दरम्यान, बैठका किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजकांवर अशाप्रकारची कारवाई जिल्ह्यात झालेली नाही.

कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर सुरुवातीला स्थानिक प्रशासन आणि नंतर राज्य शासनाने विविध निर्बंध लागू केले आहेत. मार्च महिन्यापासून या निर्बंधांना सुरुवात झाली. त्या आधीही निर्बंध होते, परंतु कोरोनाचे पेशंट नसल्यामुळे कुणी फारसे गांभीर्याने त्याकडे पहात नव्हते. मार्च महिन्यात जिल्हा प्रशासनाने गर्दीवर नियंत्रणासाठी निर्बंध घोषित केले. त्यानंतर १ एप्रिलपासून नंदुरबारात स्थानिक प्रशासनाने संचारबंदी लागू केली. मार्च महिन्यात नंदुरबार शहर पोलिसात दोन तर तालुका पोलीस ठाण्यात एक आणि शहादा पोलीस ठाण्याअंतर्गत तीन कारवाई करण्यात आली आहे.

या सहाही कारवाईंमध्ये विवाह समारंभांचे वधू-वर पक्षाकडील आयोजकांवर दंड ठोठावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सार्वजनिक कार्यक्रम किंवा बैठका घेतल्याप्रकरणी एकही कारवाई झालेली नाही.

Web Title: Action on six wedding organizers in three months