वाळू वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 12:11 IST2020-07-19T12:11:00+5:302020-07-19T12:11:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मनाई आदेश असतांनाही वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नंदुरबार व नवापूर तालुक्यात कारवाई करण्यात आली. ...

Action on sand vehicles | वाळू वाहनांवर कारवाई

वाळू वाहनांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मनाई आदेश असतांनाही वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नंदुरबार व नवापूर तालुक्यात कारवाई करण्यात आली.
नंदुरबार तालुक्यातील कोरीटनाका बंदी पॉर्इंटवर पाच जणांवर कारवाई करण्यात आली. त्यात जावेदखान कालेखान, रा.सिल्लोड, विठ्ठल शिवाजी पवार रा.कवडीपााठ, पुणे, धनाजी जाधव रा.सोलापूर, शेख मतीन शेख शफी रा.जालना व सोमनाथ अर्जून भानगडे रा.कोपरगाव यांचा समावेश आहे.
याशिवाय नवापूर येथील पिंपळनेर चौफुलीवर देखील कारवाई करण्यात आली. जितेंद्रभाई बाबूभाई गामीत, निलेशभाई गुलजीभाई गामीत रा.सोनगड असे आरोपीचे नाव आहे.
जिल्ह्यातून गुजरातच्या वाळू वाहतूकीस मनाई असतांना देखील वाहतूक होत असल्याचे यावरून दिसून येत आहे. यासाठी कडक उपाययोजनेची गरज आहे.

Web Title: Action on sand vehicles