दोन कापड दुकानदारांसह आठ ग्राहकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:29 IST2021-05-01T04:29:14+5:302021-05-01T04:29:14+5:30

नंदुरबार : कोरोनाकाळात संचारबंदी लागू असतानादेखील कापड दुकान सुरू ठेऊन ग्राहकांना दुकानात येऊ दिल्याप्रकरणी सिंधी कॉलनीतील दोन दुकानदारांसह आठ ...

Action on eight customers, including two textile shopkeepers | दोन कापड दुकानदारांसह आठ ग्राहकांवर कारवाई

दोन कापड दुकानदारांसह आठ ग्राहकांवर कारवाई

नंदुरबार : कोरोनाकाळात संचारबंदी लागू असतानादेखील कापड दुकान सुरू ठेऊन ग्राहकांना दुकानात येऊ दिल्याप्रकरणी सिंधी कॉलनीतील दोन दुकानदारांसह आठ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. उपनगर पोलिसांनी धाड टाकत तहसीलच्या पथकाने ही कारवाई केली.

जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात सकाळी ११ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असताना नंदुरबारातील सिंधी कॅालनीतील दोन कापड दुकाने सुरू असल्याची माहिती उपनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार धाड टाकली असता अंबिका फॅशन कापड दुकान व विजय कलेक्शन कापड दुकानाचा मुख्य दरवाजा बंद करून मागील दरवाजाने ग्राहकांना आत घेण्यात आले. तेथे आठ ग्राहक आढळून आले. यावेळी दुकान सील केले. तसेच दुकान मालक रमेश सुंदरलाल मालवाणी, किशोर परमानंद दावाणी (रा.जुनी सिंधी कॉलनी) यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार देवीदास सोनवणे, यादव भदाणे, प्रशांत राठोड, जमादार रघुनाथ मराठे, कांतिलाल कोकणी, अतुल गावित, सुनील येलवे, प्रेमचंद जाधव, कौशल्या गावित, सखू गावित, कल्पना वसावे, ज्ञानेश्वरी घुगे, विलास वसावे, होमगार्ड वाडील, कापुरे यांनी केली.

Web Title: Action on eight customers, including two textile shopkeepers