जलजीवन मिशनचे वर्भरात ८८ टक्के उद्दिष्ट साध्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:38 IST2021-02-17T04:38:00+5:302021-02-17T04:38:00+5:30

नंदुरबार : गेल्या वर्षभरात जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात ५१ हजार ८१५ घरांना नळ जोडणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी फेब्रुवारीपर्यंत ...

Achieved 88% target of Jaljivan Mission | जलजीवन मिशनचे वर्भरात ८८ टक्के उद्दिष्ट साध्य

जलजीवन मिशनचे वर्भरात ८८ टक्के उद्दिष्ट साध्य

नंदुरबार : गेल्या वर्षभरात जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात ५१ हजार ८१५ घरांना नळ जोडणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी फेब्रुवारीपर्यंत ८८ टक्के अर्थात एकुण ४५ हजार ६७४ घरांना नळ जोडणी देण्यात आली असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली.

जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामे प्रगतिपथावर आहेत. जिल्ह्यात एकुण तीन लाख चार हजार १९७ घरे आहेत. जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक घराला नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षभरात ५१ हजार ८१५ घरांचे टार्गेट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ४५ हजार ६७४ अर्थात ८८.१५ टक्के उद्दिष्ट साध्य झाले. त्यात नंदुरबार तालुक्यात ९२.८३ टक्के, शहादा तालुक्यात ९३.०९ टक्के, नवापूर तालुक्यात १००टक्के, तळोदा तालुक्यात ९०.१४ टक्के, धडगाव तालुक्यात ६७.७० तर अक्कलकुवा तालुक्यात ६६.६५ टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे.

Web Title: Achieved 88% target of Jaljivan Mission