पोलिसाच्या हाताला हिसका देत आरोपीने काढला पळ

By Admin | Updated: May 31, 2017 18:34 IST2017-05-31T18:34:32+5:302017-05-31T18:34:32+5:30

नंदुरबार जिल्हा कारागृहात चोरी आणि खूनाच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या खोजल्या वज्या तडवी (30)

The accused took away the hand of the policeman and grabbed the accused | पोलिसाच्या हाताला हिसका देत आरोपीने काढला पळ

पोलिसाच्या हाताला हिसका देत आरोपीने काढला पळ

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि. 31 - खून आणि चोरी केल्याच्या आरोपावरून अटकेतील आरोपी तळोदा न्यायालयाच्या आवारातून पोलिसाच्या हाताला हिसका देत फरार होण्यात यशस्वी झाला़ ही घटना बुधवारी दुपारी घडली़
नंदुरबार जिल्हा कारागृहात चोरी आणि खूनाच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या खोजल्या वज्या तडवी (30) रा़ बिजरीगव्हाण ता़ अक्कलकुवा याला बुधवारी सकाळी नंदुरबार पोलीस मुख्यालयातील कर्मचारी संजू भिमसिंग सोनवणे व रविंद्र धर्मा पाडवी हे तळोदा न्यायालयात घेऊन आले होत़े मात्र संबधित खटला शहादा न्यायालयात वर्ग झाल्याचे आदेश मिळाल्यानंतर त्याला दोघेही शहादा न्यायालयात घेऊन जाण्याच्या तयारीत होत़े दुपारी 12 वाजेच्या सुमारास तळोदा न्यायालयाच्या  प्रवेशद्वारावर रिक्षा मागवून त्यात बसण्याच्या तयारीत असतानाच संशयित खोजल्या तडवी याने पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे व पाडवी या दोघांच्या हातांना हिसका देत पळ काढला़ न्यायालयापासून मेनरोडकडे पळालेला हा आरोपी पुढे व दोघे पोलीस कर्मचारी मागे असा सिनेस्टाईल पाठलाग सुरू होत़े सुमारे  एक किलोमीटर अंतर झालेल्या या पाठलागात खोजल्या तडवी यास यश येऊन स्मारक चौकापासून तो दिसेनासा झाल्यानंतर पोलीसांनी अखेर पाठलाग थांबवून पोलीस ठाणे गाठल़े पोलीस आणि आरोपी यांच्यातील पाठशिवणीचा खेळ बघून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले होत़े अनेकांना हा प्रकार नेमका, काय आहे, हे समजून येत नव्हत़े मात्र अखेर चोरटा पळून गेल्यावर आरोपी पळाल्याचे बोंब बाजारात उठली़ याबाबत संजू सोनवणे यांनी तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन खोजल्या तडवी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
खोजल्या तडवी याने यापूर्वीही तळोदा पोलीसांनी अटक केल्यानंतर जखमी अवस्थेत तळोदा येथील उपजिल्हा रूग्णालयातून पळ काढला होता़ पोलीसांनी चकवा देत पळालेल्या खोजल्या यास तीन किलोमीटर अंतरावरील एका मक्याच्या शेतातून अटक करण्यात आली होती़ त्यावेळी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर खोजल्या यास अटक करण्यात यश आले होत़े या प्रकाराने पोलीस वतरुळात एकच खळबळ उडाली आह़े

Web Title: The accused took away the hand of the policeman and grabbed the accused