प्राध्यापकांना ऑगस्टचे वेतन नवीन आयोगानुसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 12:20 IST2019-08-02T12:20:11+5:302019-08-02T12:20:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना ऑगस्ट महिन्याचे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार दिले जाणार असल्याची माहिती उच्च ...

According to the new commission of August salary for professors | प्राध्यापकांना ऑगस्टचे वेतन नवीन आयोगानुसार

प्राध्यापकांना ऑगस्टचे वेतन नवीन आयोगानुसार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना ऑगस्ट महिन्याचे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार दिले जाणार असल्याची माहिती उच्च शिक्षण सहसंचालक प्रा.सतिश देशपांडे यांनी दिली. एन.मुक्टो संघटनेने नुकतीच त्यांची भेट घेतली असता त्यांनी ही माहिती दिली.
एन.मुक्टो कार्यकारिणीच्या वतीने अध्यक्ष प्रा.डॉ.संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नवनियुक्त उच्च शिक्षण सहसंचालक  प्रा.सतिश देशपांडे  यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले आणि जळगाव -धुळे -नंदुरबार जिल्ह्यातील प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी प्राध्यापकवर्गाला सातव्या वेतनआयोगानुसार ऑगस्ट पेड इन सप्टेंबर दिले जाईल असे सांगत जळगाव विभागातील ज्यांची वेतननिश्चिती अपूर्ण आहे, त्यांची वेतननिश्चिती 4 ऑगस्ट पयर्ंत पूर्ण केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. सहाव्या वेतन आयोगानुसार लाभास पात्र असलेल्या प्राध्यापकांसाठी विद्यापीठाने शिबीर लावल्यास त्यास सहसंचालकांचा प्रतिनिधी दिला जाईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्राध्यापकांनी संघटनेशी संपर्क साधावा असे आवाहन संघटनेतर्फे  करण्यात आले. शिष्टमंडळात सरचिटणीस सावखेडकर, डॉ. किशोर कोल्हे, डॉ. अनिल पाटील यांचा समावेश होता. 
 

Web Title: According to the new commission of August salary for professors