रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांमुळे अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST2021-02-15T04:27:49+5:302021-02-15T04:27:49+5:30

सारंगखेडा-कुकावल रस्त्यावर कळंबूजवळील तालुका बीजगुणन केंद्राजवळ गेल्या आठवड्यात सायंकाळी मोटारसायकल व कारच्या झालेल्या अपघातात कुकावल येथील एका २० ...

Accidents increased due to overgrown bushes on both sides of the road | रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांमुळे अपघात वाढले

रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांमुळे अपघात वाढले

सारंगखेडा-कुकावल रस्त्यावर कळंबूजवळील तालुका बीजगुणन केंद्राजवळ गेल्या आठवड्यात सायंकाळी मोटारसायकल व कारच्या झालेल्या अपघातात कुकावल येथील एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. या रस्त्यावर खड्ड्यांमुळे व काटेरी झुडपांमुळे वारंवार लहान-मोठे अपघात होत असताना दुरुस्तीबाबत मात्र संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. संबंधित विभागाचे अधिकारी अजून मोठा अपघात होण्याची वाट तर पाहत नाही ना? अशा संतप्त प्रतिक्रिया वाहनधारकांमधून व्यक्त होत आहेत. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती व दुतर्फा वाढलेली काटेरी झुडपे तोडण्याची मागणी सारंगखेडा, कळंबू, कुकावल परिसरातील वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.

कुकावल, कळंबू ते सारंगखेडा हा रस्ता शिरपूरकडे व कुकावलमार्गे मध्य प्रदेशात जाण्यासाठी सोयीचा असल्याने नेहमी वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढलेली आहेत. ती बऱ्याच दिवसांपासून तोडलेली नाहीत. यामुळे वाहनचालकांना वळणावर समोरून येणारे वाहन दिसत नाही परिणामी छोटे-मोठे अपघात होत आहेत.

-प्रवीण वाघ, माजी सरपंच, कळंबू, ता.शहादा

Web Title: Accidents increased due to overgrown bushes on both sides of the road