खरीप हंगामाच्या तयारीला वेग बि-बियाण्यांसह शेती औजारांची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 12:01 IST2020-06-08T12:01:44+5:302020-06-08T12:01:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : निसर्ग चक्रीवादळामुळे पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शेतकरी खरीप हंगामासाठी तयारीला लागले ...

Accelerate preparations for kharif season Purchase of farm implements including B-seeds | खरीप हंगामाच्या तयारीला वेग बि-बियाण्यांसह शेती औजारांची खरेदी

खरीप हंगामाच्या तयारीला वेग बि-बियाण्यांसह शेती औजारांची खरेदी


लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : निसर्ग चक्रीवादळामुळे पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शेतकरी खरीप हंगामासाठी तयारीला लागले असून शेतीच्या कामासाठी लागणाºया लोखंडी अवजारांची जुळवाजुळव करीत आहेत. त्यासाठी लोखंडी यंत्राची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
बागायत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी कापूस, ऊस, पपई, केळी आदींची लागवड मे महिन्याच्या शेवटी केली तर कोरडवाहू शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत. शेती कामासाठी लागणाºया कल्टीसेटिंग, नांगर, पांभर, वख्खर, बैलगाडी, धान्यपेरणी, कुदळी, फावडा या साहित्याची खरेदी शेतकरी करीत आहेत. कल्टीसेटींग हे औजार एकच आहे. मात्र पाच प्रकारचे काम त्यावर करता येते. सध्या कोरोनामुळे मजूर भेटत नसल्याने शेतकरी या यंत्राला पसंती देऊन खरेदी करीत आहेत. या औजारात पेरणी, वखरणी, कोळपणी आदी कामे करता येतात. जास्त पाऊस झाल्यास शेतात ट्रॅक्टर चालत नाही. अशाप्रसंगी लोखंडी बनावटीचे कल्टीसेटींग व बैलांच्या सहाय्याने शेतीकामे करता येतात. शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले असून शेतातील काडीकचरा वेचणे यासह विविध कामे करण्यात येत आहेत.


कल्टीसेटींग हे औजार पाच प्रकारचे शेतीकाम करते. बाजरी, सोयाबीन, हरभरा आदी पिकांची पेरणी करता येते. या औजारामुळे खर्च कमी येतो. तसेच त्यात वेगवेगळी सेटींग करून शेतीची पाच प्रकारची कामे करता येतात.
-रोहिदास पाटील,
शेतकरी, प्रकााशा, ता.शहादा.


 

Web Title: Accelerate preparations for kharif season Purchase of farm implements including B-seeds