चिमणीपाडा येथे ९५ जणांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:29 IST2021-05-23T04:29:23+5:302021-05-23T04:29:23+5:30

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी गटविकास अधिकारी चंद्रकांत माळी, केंद्रप्रमुख सुभाषचंद्र पाटील, सरपंच कांतीलाल गावीत, ग्रामसेवक प्रवीण तावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ...

95 people were vaccinated at Chimanipada | चिमणीपाडा येथे ९५ जणांनी घेतली लस

चिमणीपाडा येथे ९५ जणांनी घेतली लस

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी गटविकास अधिकारी चंद्रकांत माळी, केंद्रप्रमुख सुभाषचंद्र पाटील, सरपंच कांतीलाल गावीत, ग्रामसेवक प्रवीण तावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गावीत, वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश वळवी, डॉ.सखाराम वळवी, डॉ.प्रीती पाडवी, डॉ.स्मिता पाडवी, डॉ.अन्सारी उपस्थित होते. शिबिरापूर्वी पंधरवड्यापासून प्राथमिक शिक्षक कांचनमाला पाटील, सोमनाथ गावीत, सविता शिंदे, विजया वसावे, अनिल काकुस्ते, मीरा देवरे, राजू गावीत, सुनील सोनवणे, आरोग्य सहायक राजेंद्र परदेशी, वसंत पाडवी, आरोग्य सेविका बेबी गुळवे, आशा वळवी, संदीपा वसावे, रंजना वसावे, अंगणवाडी सेविका छाया वसावे, आशा कार्यकर्ती वर्कर आमीरा गावीत, नमिता पाडवी, इंदिरा वळवी, कोकिळा वसावे, बेबी गावीत, इंदू वळवी आदींनी चिमणीपाडा, अंबाफळी व शेगवे या गावातील प्रत्येक घरी भेट देऊन ४५ वर्ष व त्यावरील नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन करुन लस घेतल्याने होणारे फायदे समजावून सांगितले आहेत. त्यामुळे शिबिरात सामाजिक अंतर ठेवून लसीकरणासाठी ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: 95 people were vaccinated at Chimanipada