शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरीत ७०० मजूर परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : केंद्र शासनाने मजुरांच्या गावाकडील स्थलांतरास परवानगी दिल्यामुळे गुजरातमधील ७०० मजूर तळोद्यात दाखल झाले असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : केंद्र शासनाने मजुरांच्या गावाकडील स्थलांतरास परवानगी दिल्यामुळे गुजरातमधील ७०० मजूर तळोद्यात दाखल झाले असून, त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम क्वॉरंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान शनिवारी दाखल झालेल्या मजुरांपैकी एका महिलेस ताप, खोकला, सर्दीची लक्षणे आढळून आल्यानंतर तिला उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासनाने पुन्हा १७ मे २०२० पावेतो लॉकडाऊन वाढविले आहे. तथापि गुजरात अथवा इतर ठिकाणी रोजगारासाठी स्थलांतरीत झालेल्या मजुरांना आपल्या गावाकडे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापि कारखाने बंद झाल्यामुळे सदर मजुरांना रोजगाराअभावी उपासमारीस तोंड द्यावे लागत होते. साहजिकच मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे.शुक्रवार व शनिवारी असे साधारण ७०० मजूर तळोद्यात दाखल झाले आहेत. हे मजूर गुजरातमधील भरूच, मांडवी या ठिकाणी काम करीत होते. तेथून ते ट्रक, टेम्पोने आले होते. पोलिसांनी त्यांना आमलाड येथील विलगीकरण कक्षात आरोग्य तपासणीसाठी पाठविले. या मजुरांची तपासणी येथील आरोग्य यंत्रणेने केली आहे. सर्व मजुरांची थर्मल स्कॅनिंग करण्यात येवून त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारून घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.तळोदा तालुक्यातील मोरवड, रापापूर, चौगांव, वाल्हेरी येथील साधारण ४०० ते धडगाव तालुक्यातील ३०० मजूर आहेत. याबाबत धडगाव तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनादेखील कळविण्यात आले आहे.दरम्यान, शनिवारी दाखल झालेल्या मजुरांपैकी एक मजूर महिलेस ताप, खोकला, सर्दीची लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे तिला पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली. या वेळी आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, तहसीलदार पंकज लोखंडे उपस्थित होते.