१२० किलो गोवंशसदृष्य मांस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 11:43 IST2019-12-09T11:42:50+5:302019-12-09T11:43:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे गोवंश सदृश्य मांस विक्री करणाऱ्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी ...

5 kg of beef-like meat seized | १२० किलो गोवंशसदृष्य मांस जप्त

१२० किलो गोवंशसदृष्य मांस जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे गोवंश सदृश्य मांस विक्री करणाऱ्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, ८ डिसेंबर रोजी तालुक्यातील खांडबारा गावात डोंगरीला भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये रईस शफी कुरेशी (५०, रा.कुरेशी मोहल्ला, नंदुरबार) हा गोवंश मांस विक्री करीत असल्याचे आढळून आला. त्याच्याकडून सहा हजार रुपये किमतीचे गोवंश सदृश्य मांसाचे १२० किलो वजनाचे तुकडे विसरवाडी पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे व कर्मचाऱ्यांनी केली.
याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात प्रवीण दिलीप अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रईस शफी कुरेशी याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार सुरेश चौरे हे करीत आहेत.

Web Title: 5 kg of beef-like meat seized