शहरात वीज कंपनीचे ३६ वायरमन सामूहिक रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:39 PM2020-08-12T12:39:23+5:302020-08-12T12:39:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वीज वितरण कंपनीच्या लाईनमन आणि वायरमनांकडून राज्यस्तरावर सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आले आहे़ ...

36 wiremen of the power company in the city on collective leave | शहरात वीज कंपनीचे ३६ वायरमन सामूहिक रजेवर

शहरात वीज कंपनीचे ३६ वायरमन सामूहिक रजेवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वीज वितरण कंपनीच्या लाईनमन आणि वायरमनांकडून राज्यस्तरावर सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आले आहे़ यामुळे वीज दुरूस्तीची कामे खोळंबली असून शहरातील ३६ कर्मचारी सध्या रजेवर असल्याची माहिती देण्यात आली आहे़
लाईनमन व वायरमनांकडून १० ते १२ आॅगस्ट दरम्यान सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा दिला गेला होता़ सोमवारी हे आंदोलन सुरू झाले़ परिणामी सोमवारपासून शहरात वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर दुरुस्ती करुन तो पूर्ववत करण्याची कामे थांबली होती़ या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रभारी कार्यकारी अभियंता मनिषा कोठारी यांनी पर्यायी कर्मचारी सोबत घेत ठिकठिकाणी दुरूस्तीची कामे पूर्ण केली होती़ बुधवारी आंदोलनाचा शेवटचा दिवस आहे़ कंपनीने पर्यायी कर्मचारी नियुक्त केले आहेत़ दरम्यान मंगळवारी काही शासकीय कार्यालयात दिवसभर वीज पुरवठा बंद असल्याने कामकाज होवू शकले नव्हते़

Web Title: 36 wiremen of the power company in the city on collective leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.