शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील 31 लघु आणि तीन मध्यम प्रकल्प ओसंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 22:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे 31 लघु प्रकल्प 100 टक्के भरुन ओसंडून वाहू लागले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे 31 लघु प्रकल्प 100 टक्के भरुन ओसंडून वाहू लागले आहेत़ तर दुसरीकडे दोन मध्यम प्रकल्प 100 टक्के भरल्याने शेती सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आह़े            जिल्ह्यात आतार्पयत 107 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आह़े मंगळवारपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने नदी-नाल्यांच्या पुराच्या पाण्यात पुन्हा वाढ झाली होती़ यातून ठिकठिकाणी असलेल्या लघुप्रकल्पांत पाणी साठा वाढून त्यांच्या सांडव्यावरुन पाणी वाहत आह़े नवापुर, नंदुरबार आणि शहादा तालुक्यातील बहुतांश प्रकल्प 100 टक्के भरल्याने त्यातील पाणी नदी नाल्यांच्या पात्रात येऊन पुर आले आहेत़ 2006 नंतर हे सर्व प्रकल्प भरल्याची माहिती देण्यात आली असून पाऊस सुरुच राहिल्यास उर्वरित सहा लघुप्रकल्पांमध्येही 100 टक्के होणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आह़े प्रकल्पातून ओसंडून वाहणा:या पाण्यामुळे येत्या काळातील सिंचनाचा प्रश्न निकाली निघाला असून भूजल पातळीतही वाढ होणार आह़े या पाश्र्वभूमीवर भूजल सव्रेक्षण विभागाकडून भूजल पातळी निश्चित करण्यासाठी सव्रेक्षण मोहिम हाती घेण्यात आली असून जिल्ह्याच्या विविध भागातील 50 निरीक्षण विहिरींमध्ये भूजल पातळी तपासणीसाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आह़े यांतर्गत येत्या महिनाअखेर्पयत ही तपासणी पूर्ण होऊन अंतिम अहवाल हाती येणार आह़े तपासणीसाठी घेतलेल्या विहिरींची पातळी 1 मीटरपेक्षा वर असल्याने यंदा भूजल पातळीत वाढ निश्चित असल्याचे सांगितले जात आह़े 

नवापुर तालुक्यातील खडकी, खेकडा, मेंदीपाडा, मुगधन, नावली, रायंगण,सोनखडकी, सुलीपाडा विसरवाडी, नंदुरबार तालुक्यातील आंबेबारा, कोकणीपाडा, पावला, शनिमांडळ, शिरवाडे 1 आणि 2, वासदरा, शहादा तालुक्यातील दुधखेडा, खापरखेडा, कोंढावळ, लंगडीभवानी, लोंढरे, तळोदा तालुक्यातील गढावल, पाडळपूर, रोझवा, सिंगसपूर हे 31 प्रकल्प 100 टक्के भरले आहेत़ तर नवापुर तालुक्यातील हळदाणी 63, खोकसा 97, नंदुरबार तालुक्यात धनीबारा 78, वसलाय 66, वावद 85, शहादा तालुक्यातील राणीपुर 61, अक्कलकुवा तालुक्यातील खडकुना 74, तळोदा तालुक्यातील महूपाडा 83 तर धडगाव तालुक्यातील एकमेव उमराणी प्रकल्पात 94 टक्के पाणीसाठा झाला आह़े सर्व 37 लघुप्रकल्पांमध्ये सध्या 2 हजार 942़81 दशलक्ष घनफूट पाणी आह़े गत आजच्या दिवशी या प्रकल्पांमध्ये केवळ 57 टक्के साठा होता़ परंतू आजरअखेरीस झालेल्या मुसळधार पावसामुळे या प्रकल्पात 94 टक्के जलसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाने कळवले आह़े 

जिल्ह्यात रंगावली मध्यम प्रकल्प आणि दरा मध्यम प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा झाला आह़े शिवण प्रकल्प 92 टक्के भरला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आह़े प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेजचे गेट दोन मीटर्पयत वर उचचले गेल्याने येथून पाण्याचा विसर्ग सुरु आह़े यातून तेथे अद्याप पाण्याचा साठा स्थिर नाही़ परंतू येत्या काळात दोन्ही बॅरेज प्रकल्पाचे गेट बंद झाल्यानंतर पूर्णक्षमतेने साठा होणार असल्याची चिन्हे आहेत़ दोन्ही बॅरेज प्रकल्पात सप्टेंबर 2017 मध्ये 65 टक्के, 2018 मध्ये 65 टक्के तर तूर्तास 95़15 टक्के साठा असल्याचे विभागाचे म्हणणे आह़े लघुप्रकल्पात सप्टेंबर 2017 मध्ये 44 टक्के, 2018 मध्ये 44 तर आजअखेरीस 94़16 टक्के पाणीसाठा झाला आह़े दोन वर्षाच्या कालावधीनंतर जलसाठय़ाने 100 टक्क्यांकडे वाटचाल केल्याने येत्या काळातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कमी होणार आह़े