शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हात म्युकरमायकोसिसच्या २२ रुग्णांची नोंद, जिल्हा रुग्णालयात १० रुग्ण दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST

कोरोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार आढळून येत आहे. कोरोनानंतर या आजाराने डोके वर काढल्याने ...

कोरोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार आढळून येत आहे. कोरोनानंतर या आजाराने डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या आजारावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २२ रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांनी दिली असून १० म्युकरमायकोसिसचे रुग्ण या कक्षात उपचार घेत आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक या रुग्णांवर उपचार करीत असून काही रुग्णांवर शत्रक्रियाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

म्युकरमायकोसिस आजारावर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला असला तरी रुग्णांना आवश्यक त्या प्रमाणात इंजेक्शन व औषधी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. अनेक रुग्णांना स्वखर्चाने या आजारांवरील महागडी औषधे विकत घ्यावी लागत असल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. रविवारी तर रुग्णांना देण्यासाठी इंजेक्शन उपलब्ध झाले नसल्याने रुग्णांना इंजेक्शन दिली गेली नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हा रुग्णालयात शनिवारपर्यंत ५० इंजेक्शन उपलब्ध झाली होती. रविवारी इंजेक्शन उपलब्ध नसल्याने देण्यात आली नव्हती तर सोमवारी १३ इंजेक्शन उपलब्ध झाले असून रुग्णांच्या रक्त चाचण्या करून त्यांना आवश्यकतेनुसार इंजेक्शन दिली जातात. आतापर्यंत म्युकरमायकोसिस आजारावरील ६३ इंजेक्शन प्राप्त झाली असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

अनेक रक्त चाचण्याही रुग्णांना स्वखर्चाने कराव्या लागत असल्याचा अनुभव आहे. म्युकरमायकोसिस आजारावरील उपचार खूप महागडा असून सर्वसामान्य रुग्णांना तो परवडणारा नाही. जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य परिस्थिती असणारे रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. आधीच कोरोनाच्या उपचारात आर्थिक झळ बसलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी अशाप्रकारे बाहेरून महागडी औषधी, इंजेक्शने व रक्त चाचण्या कराव्या लागत असल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे. जिल्हा रुग्णालयात सर्व रक्त चाचण्या व आवश्यक औषधी रुग्णांना मिळावी, अशी रुग्णांच्या कुटुंबीयांची मागणी आहे.

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या २२ रुग्णांची नोंद झाली असून १० रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. वरिष्ठ पातळीवरून ज्या प्रमाणात औषधी व इंजेक्शन उपलब्ध होत आहेत त्यानुसार रुग्णांना आवश्यकतेनुसार दिली जात आहेत.

-डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नंदुरबार