शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात २० ऑक्सिजन बेड कार्यान्वित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST

शहादा शहर व तालुक्यात कोरोनाची व्याप्ती वाढत आहे. ती कमी करण्यासाठी शासन स्तरावर वेगवेगळे उपाय योजले जात आहे. मार्च ...

शहादा शहर व तालुक्यात कोरोनाची व्याप्ती वाढत आहे. ती कमी करण्यासाठी शासन स्तरावर वेगवेगळे उपाय योजले जात आहे. मार्च महिन्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवसागणिक बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय तसेच खाजगी रुग्णालयेही फुल्ल झाले असून नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे. अनावश्यक घराबाहेर निघणे टाळावे, महत्त्वाचे काम असल्यास घराबाहेर निघताना मास्क परिधान करावा, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा, दूध, भाजीपाला, किराणा आदी तत्सम वस्तूंच्या घरपोच सेवेस प्राधान्य द्यावे, असे आवाहनही डॉ.गिरासे यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी आजार लपवू नये, सौम्य लक्षणे आढळली तरी कोरोना चाचणी करून घ्यावी, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार करावेत, आवश्यकता असल्यास रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घ्यावे. अनावश्यक काळजी न करता नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग राखावे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी त्रिसूत्रीचा वापर करावा. घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी मोहिदे त.श., ता.शहादा येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये प्रशासनाने भविष्यातील धोका ओळखून तात्काळ २० ऑक्सिजन बेड तयार केले असून दोन दिवसात ते कार्यान्वित होतील. रविवारी प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र वळवी उपस्थित होते. ऑक्सिजन बेडसाठी स्वतंत्र स्टाफ कार्यान्वित असेल. याआधीच १२० बेड कमी लक्षणे अथवा लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.