शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा,१९५ कोटी मंजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 11:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधकामासाठी केंद्र शासनाने त्यांच्या हिस्याचा १९५ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधकामासाठी केंद्र शासनाने त्यांच्या हिस्याचा १९५ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. आता राज्य शासनाचा वाट्याचा १३० कोटी रुपयांचा निधी मिळाल्यास इमारत बांधकामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, केंद्राच्या समितीकडून अंतिम मंजुरी मिळताच या वर्षापासून पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार डॉ.हिना गावीत यांनी पत्रकार परिषदेत दिली.नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. एकदा कॉलेज मंजूर होऊन रद्द झाले होते. नंतर चार वर्षांपूर्वी पुन्हा मंजुरी मिळाली. त्यानंतर कॉलेजच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. केवळ शेवटची मंजुरी मिळताच हे कॉलेज सुरू होणार आहे.निधीला मंजुरीमेडिकल कॉलेजच्या मंजुरीसाठी खासदार डॉ.हिना गावीत व आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी पाठपुरावा केला होता. त्यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना खासदार डॉ.गावीत यांनी सांगितले, मेडिकल कॉलेजच्या मंजुरीसाठी आपला व आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचा सुरुवातीपासूनच प्रयत्न होता. एकदाची कॉलेजला मंजुरी मिळाली व पुढील प्रक्रिया सुरू झाली. आता कॉलेजच्या इमारतीच्या बांधकामासाठी निधीची आवश्यकता होती. केंद्र शासनाने देशातील ४२ मेडिकल कॉलेजसाठी निधी मंजुर केला असून त्यात महाराष्टÑातील एकमेव नंदुरबारची कॉलेज आहे. एकुण ३२५ कोटी रुपये त्यासाठी लागणार आहेत. त्यातील ६० टक्के हिस्सा हा केंद्रांचा असतो तर ४० टक्के हिस्सा हा राज्य सरकारचा असतो. ६० टक्के हिस्साअंतर्गत १९५ कोटी रुपये केंद्राने मंजुर केले आहे. आता राज्य शासनाला १३० कोटी रुपयांचा हिस्सा द्यावा लागणार आहे. तो देखील लवकरच मिळावा यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.जागेलाही मंजुरीमेडिकल कॉलेजसाठी लागणारे हॉस्पीटल हे सिव्हीलचेच हॉस्पीटल राहणार आहे. त्यासाठी सर्व प्रक्रिया पुर्ण झाली आहे. त्यामुळे केवळ आता कॉलेजच्या इमारती आणि होस्टेलच्या इमारतींची गरज आहे. त्यासाठी टोकरतलाव रस्त्यावरील १६.६३ हेक्टर जागा मिळाली आहे. त्याठिकाणी आवश्यक त्या इमारती उभ्या राहणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाकडील निधी लवकर मिळाला तर बांधकामांना सुरुवात होणार आहे.या वर्षी प्रवेश प्रक्रियापहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी यंदा प्रवेश प्रक्रिया राबविली जावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्राच्या समितीने काढलेल्या सर्व त्रुटी पुर्ण करण्यात आल्या आहेत. आता शेवटची मंजुरी मिळताच सर्व मार्ग मोकळा होणार आहे. याशिवाय डॉक्टर, प्राध्यापक, सहप्राध्यापक यांच्या भरतीसाठी व इतर बाबींसाठी राज्याच्या हायपॉवर कमिटीची बैठक होणे आवश्यक असून. त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार डॉ.हिना गावीत यांनी यावेळी दिली.देशभरातील आदिवासी भागातील एकुण ४२ मेडिकल कॉलेजसाठी केंद्र सरकारने निधी मंजुर केला आहे. त्यातील महाराष्टÑातील केवळ नंदुरबारच्या मेडिकल कॉलेजचा समावेश आहे.जर भरती प्रक्रिया राबविली गेली नाही तर इतर भागातून प्रतिनियुक्तीवर डॉक्टर व प्राध्यापक आणि सहप्राध्यापक आणण्यात येणार आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.जिल्हा रुग्णालयात देखील आवश्यक बदल करण्यात येणार आहेत.