शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यग्रहण पाहण्यासाठी 15 हजार चष्मे उपलब्ध करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : 26 डिसेंबर रोजी सूर्यग्रहणाच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीच्या वतीने प्रबोधन मोहीम राबवली जाणार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : 26 डिसेंबर रोजी सूर्यग्रहणाच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीच्या वतीने प्रबोधन मोहीम राबवली जाणार आहे. ग्रहण काळात ग्रहणाबाबत असणा:या विविध प्रकारच्या अंधश्रद्धांच्याविरोधात या मोहिमेत प्रबोधन केले जाणार असून सूर्यग्रहणाचा  खगोलीय आविष्कार पाहण्यासाठी संघटनेकडून 15 हजार चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे  यांनी नवापूर येथील जिल्हा बैठकीत दिली.महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीच्या नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीची बैठक नवापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पार पडली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.ए.जी. जयस्वाल तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य सरचिटणीस विनायक  साळवे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.के.बी. महाजन, श्रीकांत पाठक, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, प्रधान सचिव किर्तीवर्धन तायडे आदी उपस्थित होते. सुरुवातीला जिल्ह्यातील प्रमुख            शाखांचा मागील चार महिन्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर शाखानिहाय संघटनात्मक व उपक्रमात्मक तसेच अडचणींवर चर्चा करण्यात आली. अंनिसच्या कामात महिला व युवकांचा सहभाग वाढावा यासाठी संघटनात्मक तसेच उपक्रमात्मक अडचणींवर मात करण्यासाठी आगामी काळासाठी कृतीकार्यक्रम बैठकीत ठरविण्यात आला. डिसेंबर महिन्यात सभासद नोंदणी करणे व शाखा कार्यकारिणी निवड प्रक्रिया राबवणे, किमान एका नवीन शाखेची निर्मिती करणे, शाखांना आवश्यक संघटना बांधणी वैचारिक व चमत्कार प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे, 24 ते 25 डिसेंबर व्यसनविरोधी सप्ताह,  3 जानेवारी ते 12 जानेवारी स्त्रीशक्ती           जागर अभियान, 26 नोव्हेंबर ते 30 जानेवारी संविधान बांधिलकी महोत्सव आदी उपक्रम आयोजित करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. बैठकीला जिल्ह्यातील तळोदा, नंदूरबार, नवापूर, शहादा, कळंबू शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीसाठी प्रा.के.बी, चव्हाण, प्रा.मुरलीधर उदावंत, प्रा.जयश्री चव्हाण, प्रा.हणमंत सरतापे, जयश्री पाटील, प्रतिक पाठक, मंगेश बेडसे, प्रदीप गावीत, अनिल गावीत, पंजाबसिंग यांच्यासह कार्यकत्र्यानी परिश्रम घेतले.

ग्रहणांच्या गैरसमजुतीविषयी अंनिसची प्रबोधन मोहिमेत शाळा-महाविद्यालयांमध्ये ग्रहण आणि अंधश्रद्धा याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे.  ग्रहणाच्या दिवशी गरोदर स्त्रियांनी ग्रहण काळात भाजी फळे न कापणे याचा प्रत्यक्ष कृतीतून विरोध करण्यात येणार आहे. ग्रहण शास्त्रीय चष्म्यातून पाहण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रहण व अंधश्रद्धा याबाबत प्रबोधनासाठी पोस्टर प्रदर्शन भरविण्यात येईल. राज्यभर महाराष्ट्र अंनिसच्या वतीने ही प्रबोधन मोहीम राबविण्यात येणार आहे.