शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या १३ हजार शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद असलेल्या १३ हजार शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद असलेल्या १३ हजार शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभ मिळण्याची प्रतिक्षा आहे़ ही प्रतिक्षा येत्या आठवड्यात संपणार अशी अपेक्षा असून जिल्ह्यात २२२ पात्र शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले आहे़ जिल्ह्यात १ लाख ६ हजार सभासद खातेदार असलेल्या डीडीसीसी बँकेने शेतकºयांना पीक कर्ज वाटप सुरु केले होते़ यांतर्गत आजअखेरीस जिल्ह्यातील ४ हजार ८४८ शेतकºयांना ४२ कोटी २२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे़ दिवसेंदिवस बँकेच्या कर्ज वाटपाची प्रक्रिया गतीमान होत असली तरीही महात्मा फुले १३ हजार शेतकºयांच्या पीक कर्जाचा प्रश्न मात्र प्रलंबित आहे़ हे शेतकरी महात्मा फुले कृषी कर्जमुक्ती योजनेत समाविष्ट आहेत़ त्यांना सरसकट कर्ज देण्याचे शासनाचे आदेश असले तरी ७५ कोटी रुपयांचा कर्जवाटप लक्षांक घेणाºया जिल्हा बँकेकडे या शेतकºयांचे माफ केलेले कर्ज भरण्यासाठी रक्कम नसल्याने बँकेने शिखर बँकेकडे ९० कोटी रुपयांचे कर्ज मागितले आहे़ मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही़ येत्या आठवड्यात यावर निर्णय होण्याची शक्यता असून त्यानुसार कारवाई झाल्यास मोठी अडचण दूर होणार आहे़ गेल्या आठवड्यात या शेतकºयांचे कर्ज मागणीचे अर्ज भरुन घेण्यात आले आहेत़ या सर्व शेतकºयांचे आधार प्रमाणिकरणही पूर्ण झाले असून कर्जमाफीची रक्कम येत्या आठवड्यात मिळाल्यास खरीप हंगामाच्या कामांना गती मिळणार आहे़ या शेतकºयांना शासनाने कर्जमुक्त करण्याची प्रक्रिया लांबवल्यास खरीप हंगामासाठी त्यांना पुन्हा सावकाराच्या दारात जावे लागणार आहे़ शासनाने घोषित केलेल्या कर्जमुक्तीचा लाभ मिळत नसल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली होती़ आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले असले तरी विलंब लागत असल्याने खरीप हंगामासाठी नियोजन करताना शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ शासनाने खात्यांवर रक्कम टाकण्याची मागणी शेतकºयांची आहे़

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज वाटपात आघाडी घेतली आहे़ बँकेने ४ हजार ८४८ शेतकऱ्यांना ४२ कोटी २२ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे़ आतापर्यंत लक्षाकांच्या ७० टक्के कर्जवाटप बँकेने पूर्ण केली आहे़ तर दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांच्या कामांना अद्याप गती आलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे़ राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि खाजगी बँकांनी मिळून ३ हजार ६४८ शेतकऱ्यांना ६८ कोटी ५१ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरीत केले आहे़ जिल्ह्यात सर्व बँका मिळून आतापर्यंत १४ टक्के कर्जाचे वाटप झाले असल्याची माहिती समोर आली आहे़

२०१९-२० या वर्षाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १३ हजार ४८६ शेतकऱ्यांनी १८९ कोटी ८९ लाख रुपयांचे कर्ज गेल्या वर्षी घेतले होते़ कृषी कर्जमुक्ती योजनेंतर्गतही ही रक्कम ग्राह्य धरली जाणार आह़े, गेल्या वर्षी जिल्हा बँकेने ५ हजार ४८१ सभासदांना ४२ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे़ राष्ट्रीयकृत बँकांनी ५ हजार १८९ सभासदांना ९० कोेटी ४२ लाख रुपयांचे तर खाजगी आणि ग्रामीण बँकांनी मिळून १ हजार ४११ शेतकऱ्यांना ३४ कोटी रुपयांचे कर्ज दिल्याची माहिती आहे़ एकूण १८९ कोटी रुपयांच्या रकमेबाबत शासनाकडून अद्याप कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत़ कर्जमुक्तीचा कालावधी यापूर्वीचा असल्याने तेव्हापासूनचे कर्ज वितरणाचे आकडे काढून शासनाकडे देण्यात आले आहेत़ यानंतरही शेतकºयांची खाती आधारने अपडेट करण्यात आल्याने रकमेचा निश्चित आकडा येत्या आठ दिवसात समोर येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़

डीडीसीसी बँकेचे नंदुरबार जिल्ह्यात एकूण १ लाख ६ हजार खातेदार आहेत़ तर २३५ विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून ३७ हजार ७०२ सभासद शेतकरी आहेत़ यात शहादा १३ हजार ८२६, नंदुरबार ११ हजार ८८, नवापुर ५ हजार ६४३, तळोदा १ हजार ८३१, अक्कलकुवा ७२६ तर धडगाव तालुक्यात ४ हजार ५८८ सभासदांचा समावेश आहे़१ लाखाच्या जवळपास खातेदार सभासदांपैकी ३७ हजार ७०२ सभासद हे किसान क्रेडीट कार्डचा वापर करतात़ जिल्ह्यात बँकेच्या एकूण १९ हजार ९६ शेतकऱ्यांना रुपे कार्ड देण्यात आले असून गेल्या हंगामापासून ते याद्वारे मंजूर झालेले कर्ज इतर बँकांच्या एटीएममधून घेत आहेत़ बँकेचे १४ हजार ३१३ शेतकरी सभासद हे नियमित खातेदार असून त्यांच्याकडून वेळोवेळी कर्ज घेऊन त्याचा परतावा केला जातो़