शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

खाजगी डॉक्टरसह रजाळेतील १२ जण ‘निगेटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:56 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुंबई येथून तालुक्यातील रजाळे येथे आलेल्या कुटूंबाच्या संपर्कात आलेल्या १२ जणांसह शहरातील एका डॉक्टरांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुंबई येथून तालुक्यातील रजाळे येथे आलेल्या कुटूंबाच्या संपर्कात आलेल्या १२ जणांसह शहरातील एका डॉक्टरांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे़ सोमवारी दुपारी हे रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे़जिल्हा रुग्णालयाने रजाळे येथील ६६ वर्षीय वृद्ध व त्याच्या कुटूंबाच्या संपर्कात आलेल्या १२ जणांचे स्वॅब नमुने घेत तपासणीसाठी धुळे येथे पाठवले होते़ गेल्या दोन दिवसांपासून या रिपोर्टची प्रतिक्षा होती़ दरम्यान रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयाला रिपोर्ट पाठण्यात आले होते़ सकाळी रुग्णालय प्रशासनाने अहवाल प्रसारित करत ४१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिली आहे़ सोबत रजाळे येथील बाधितावर उपचार करणाऱ्या शहरातील खाजगी डॉॅक्टरांचेही स्वॅब तपासणीसाठी दिले गेले होते़ हे नमुनेही निगेटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली आहे़ धुळे वैद्यकीय महाविद्यालयात जिल्ह्यातून संकलित करण्यात आलेले १०५ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित होता़ सोमवारी सकाळी यातील ४१ रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत़ सोमवारी परत १९ स्वॅब गेल्यामुळे आता ८३ रिपोर्टची प्रतिक्षा आहे़ या स्वॅबचा अहवाल मंगळवारी प्राप्त होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील १ हजार २२४ नागरिकांचे स्वॅब तपासून पूर्ण झाले आहेत़ यातील १ हजार १०५ स्वॅब रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत़ तर ३० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ यापैकी दोघांचा मृत्यू तर १९ जण यापूर्वी कोरोनामुक्त झाले आहेत़या अहवालात सिव्हीलमधील टेक्निशियन आणि ब्रदर (परिचर) यांच्या संपर्कातील आठ लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ हे सर्व संपर्क जिल्हा रुग्णालय व क्वारंटाईन कक्षातील आहेत़जिल्हा रुग्णालयात ब्रदर म्हणून रुग्णांची सेवा करणाºया युवकाच्या म्हसावद येथील बहिणीचा रिपोर्टही निगेटिव्ह आला असल्याची माहिती आहे़ टेक्निशियनच्या कुटूंबातील तिघांच्या रिपोर्टची मात्र अद्याप प्रतिक्षा आहे़ सोमवारी रात्री उशिरा येणाºया रिपोर्टमध्ये हे अहवाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे़ दरम्यान सोमवारी नव्याने काही स्वॅब पाठवण्यात येतील असे सांगण्यात आले आहे़ धुळे वैद्यकीय महाविद्यालयातून येथून स्वॅब रिपोर्ट लवकर मिळावेत यासाठी पाठपुरावा सुरु आहे़