खाजगी डॉक्टरसह रजाळेतील १२ जण ‘निगेटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:56 AM2020-05-26T11:56:07+5:302020-05-26T11:56:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुंबई येथून तालुक्यातील रजाळे येथे आलेल्या कुटूंबाच्या संपर्कात आलेल्या १२ जणांसह शहरातील एका डॉक्टरांचा ...

12 people in Rajale with private doctor 'negative' | खाजगी डॉक्टरसह रजाळेतील १२ जण ‘निगेटिव्ह’

खाजगी डॉक्टरसह रजाळेतील १२ जण ‘निगेटिव्ह’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मुंबई येथून तालुक्यातील रजाळे येथे आलेल्या कुटूंबाच्या संपर्कात आलेल्या १२ जणांसह शहरातील एका डॉक्टरांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे़ सोमवारी दुपारी हे रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे़
जिल्हा रुग्णालयाने रजाळे येथील ६६ वर्षीय वृद्ध व त्याच्या कुटूंबाच्या संपर्कात आलेल्या १२ जणांचे स्वॅब नमुने घेत तपासणीसाठी धुळे येथे पाठवले होते़ गेल्या दोन दिवसांपासून या रिपोर्टची प्रतिक्षा होती़ दरम्यान रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयाला रिपोर्ट पाठण्यात आले होते़ सकाळी रुग्णालय प्रशासनाने अहवाल प्रसारित करत ४१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिली आहे़ सोबत रजाळे येथील बाधितावर उपचार करणाऱ्या शहरातील खाजगी डॉॅक्टरांचेही स्वॅब तपासणीसाठी दिले गेले होते़ हे नमुनेही निगेटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली आहे़ धुळे वैद्यकीय महाविद्यालयात जिल्ह्यातून संकलित करण्यात आलेले १०५ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित होता़ सोमवारी सकाळी यातील ४१ रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत़ सोमवारी परत १९ स्वॅब गेल्यामुळे आता ८३ रिपोर्टची प्रतिक्षा आहे़ या स्वॅबचा अहवाल मंगळवारी प्राप्त होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़
दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील १ हजार २२४ नागरिकांचे स्वॅब तपासून पूर्ण झाले आहेत़ यातील १ हजार १०५ स्वॅब रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत़ तर ३० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ यापैकी दोघांचा मृत्यू तर १९ जण यापूर्वी कोरोनामुक्त झाले आहेत़

या अहवालात सिव्हीलमधील टेक्निशियन आणि ब्रदर (परिचर) यांच्या संपर्कातील आठ लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़ हे सर्व संपर्क जिल्हा रुग्णालय व क्वारंटाईन कक्षातील आहेत़
जिल्हा रुग्णालयात ब्रदर म्हणून रुग्णांची सेवा करणाºया युवकाच्या म्हसावद येथील बहिणीचा रिपोर्टही निगेटिव्ह आला असल्याची माहिती आहे़ टेक्निशियनच्या कुटूंबातील तिघांच्या रिपोर्टची मात्र अद्याप प्रतिक्षा आहे़ सोमवारी रात्री उशिरा येणाºया रिपोर्टमध्ये हे अहवाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे़ दरम्यान सोमवारी नव्याने काही स्वॅब पाठवण्यात येतील असे सांगण्यात आले आहे़ धुळे वैद्यकीय महाविद्यालयातून येथून स्वॅब रिपोर्ट लवकर मिळावेत यासाठी पाठपुरावा सुरु आहे़

Web Title: 12 people in Rajale with private doctor 'negative'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.