शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नमंजुषा स्पर्धेत ७८ विद्यार्थी सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा उपक्रमात २८ शाळांमधील ७८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकुण पाच संघ तयार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा उपक्रमात २८ शाळांमधील ७८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकुण पाच संघ तयार करण्यात आले होते.नंदुरबार येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कुलमध्ये पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे तालुस्तरीय विज्ञान प्रश्न मंजुषा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास पंचायत समिती सभापती प्रकाश गावीत, गट विकास अधिकारी अशोक पटाईत, सहायक गट विकास अधिकारी दिनेश वळवी, गटशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, विस्तार अधिकारी एस. एन. पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाव्दारे मुलांचा बौध्दिक विकास, विज्ञान विषयाची गोडी व जिज्ञासा यासाठी प्रश्नमंजुषा कार्यक्रम लाभदायक असल्याचे प्रतिपादन डॉ. राहुल चौधरी यांनी केले.उद्घाटन सहभागी विद्यार्थ्यांना प्रश्नाची चिठ्ठी स्वरुपात देऊन मान्यवरांनी नाविन्यपूर्ण पध्दतीने केले. कार्यक्रमात नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, नगर पालिका शाळा , शासकीय आश्रम शाळा असे एकुण २८ शाळांमधील एकुण ७८ विद्यार्थ्यांनी व मार्गदर्शक शिक्षकांनी सहभाग नोंदविला.कार्यक्रमात एकुण पाच संघ करण्यात आले होते. त्यांत डॉ. सी व्ही.रमण संघ, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम संघ , डॉ. होमी भाभा संघ , डॉ. हरगोविदसिंग खोराणा संघ, डॉ. आचार्य प्रफुलचंद्र रे संघाचा समावेश होता.मुल्यामापन समितीमध्ये कोठली केंद्र प्रमुख एस.एम.पाटील, धानोरा केंद्र प्रमुख उदय बोरसे ,पिंपळोद केंद्र प्रमुख एच .व्ही. वाघ, बलदेव वसईकर ,दिपक खैरनार , काशिनाथ पवार, सपना हिरे , पुष्पाजंली पाडवी होते.कार्यक्रमास पोद्दार इटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य मुकुंद इंगळे व प्रशासन अधिकारी शरद जाधव यांचे सहकार्य लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांना व संघाला मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले.