शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

wd: उमरी : बी. व्ही. चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:18 IST

Fwd: उमरी : बी. व्ही. चव्हाण उमरीत तहसील कार्यालयाला जत्रेचे स्वरूप * प्रशासनाच्या नियोजनाचा उडाला फज्जा लोकमत ...

Fwd: उमरी : बी. व्ही. चव्हाण

उमरीत तहसील कार्यालयाला जत्रेचे स्वरूप

* प्रशासनाच्या नियोजनाचा उडाला फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने उमरी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकच झुंबड उडाली असून, निवडणूक विभागाच्या नियोजनाचा मात्र पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले. तहसील कार्यालय तसेच आजूबाजूचा एक किलोमीटरचा परिसर कार्यकर्ते व दुचाकी, चारचाकी वाहनांनी भरून गेला आहे. गोरठा रस्त्यावर तहसील कार्यालय असून, या रस्त्याने पुढे एकही वाहन जाऊ शकले नाही, अशी परिस्थिती आज बुधवारी सकाळपासूनच निर्माण झाली. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः खोळंबली. पोलिसांनाही ही वाहतूक सुरळीत करणे अशक्य झाले. ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून सर्व्हर डाऊनचा अडथळा निर्माण झाला. त्यामुळे लोकांना उमेदवारी अर्ज दाखल करता आले नाहीत. आज शेवटच्या दिवशी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास निवडणूक आयोगाने मुभा दिल्यानंतर इच्छुकांनी अर्ज भरण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ५७ गावांतील पॅनलप्रमुख, उमेदवार सहकारी कार्यकर्ते, महिला, वृद्ध यांच्यामुळे तहसील कार्यालय व परिसरात तोबा गर्दी झाली. फेरीवाले, हॉटेल्स, चहा टपरी आदी व्यावसायिकांची मात्र चांगलीच चांदी झाली. विशेष म्हणजे कोरोना साथरोगाचा अजूनही धोका कायम आहे. मात्र, येथे कसल्याच प्रकारचे नियम पाळण्यात आले नाहीत. जो-तो आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपल्याच तंद्रीत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे तहसील कार्यालयात नागरिकांना बसण्यासाठी सोय, तसेच पाणी आदी कुठलीच व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. अनेक महिला, वृद्धांना रांगेमध्ये जमिनीवर बराच वेळ बसून राहावे लागले.