शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

एकमेकांना वाचवायला गेले अन् चौघेही बुडाले; नांदेडात खदानीत पोहताना ४ मित्रांचा बुडून मृत्यू 

By श्रीनिवास भोसले | Updated: August 6, 2024 14:01 IST

खदान परिसरात फोटोसेशन करून पाच मित्र पोहण्यासाठी खदानित उतरले.

सोनखेड (जि.नांदेड): नांदेड शहरापासून जवळच असलेल्या झरी परिसरातील खदानीमध्ये पोहण्यास गेलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाला तर एक जण बचावला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. मयत सर्व इयत्ता बारावीतील विद्यार्थी असल्याचे समजते. चौघांचे मृतदेह मिळाल्याची माहिती आहे.

लोहा तालुक्यातील झरी परिसरात विद्यापीठाच्या बाजूला एक मोठी खदान आहे. या ठिकाणी साचलेल्या पाण्यात नांदेडसह परिसरातील अनेकजण पोहण्यासाठी येत असतात. मंगळवारी पहाटे देगलूर नाका परिसरातील पाच मित्र पोहण्यासाठी झरी परिसरात आले. त्यांनी या परिसरात फोटोसेशन करून पोहण्यासाठी खदानित उतरले. पण, पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. मयतांमध्ये शेख फुज्जाइल, काजी मुजम्मिल, आफान आणि सय्यद सिद्दिकी याचा समावेश आहे. तर मोहम्मद फैजान हा बचावला आहे.

घटनेची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी नांदेड येथील अग्निशमन दलाच्या पथकासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांना सुरुवातीस दोन आणि नंतर काही वेळाने दोन अशी चौघांची मृतदेह आढळून आले आहेत. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, सोनखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने आणि इतर कर्मचारी उपस्थित आहेत.

एकमेकांना वाचवायला गेले अन् चौघेही बुडाले खदानी परिसरात फोटोसेशन केले. एकमेकांसोबत सेल्फी  काढले. त्यानंतर पोहण्याचा मोह आवरता न आल्याने मोहम्मद फैजान वगळता चौघेजण पाण्यात उतरले. आफान पोहत पोहत पुढे गेला. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याला माघारी परतने कठीण झाले. त्यात दम लागल्याने तो बुडू लागल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी इतरांनी त्याच्याकडे धाव घेतली. परंतु चौघांचाही बुडून मृत्यू झाला.

टॅग्स :NandedनांदेडDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी