नांदेड - शहरातील भावसार चौक भागात आठवडा बाजारात खरेदी करताना एका महिलेच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची पोत चोरट्याने लंपास केली. ही घटना दिनांक ६ जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. कांचनबाई शेषराव कांबळे (रा. विजयनगर) ही महिला आठवडा बाजारात भाजीपाला खरेदी करत होती. यावेळी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची पोत चोरली. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसऱ्या एका घटनेत रिक्षातून जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल लांबविण्यात आला. शेख अशफाक इस्माईल हे दिनांक ५ जानेवारी रोजी हिंगोली गेट ते बाफना टी पॉईंट दरम्यान रिक्षातून प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या खिशातील २० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेच्या गळ्यातील पोत लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:14 IST
नांदेड - शहरातील भावसार चौक भागात आठवडा बाजारात खरेदी करताना एका महिलेच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची पोत चोरट्याने ...
महिलेच्या गळ्यातील पोत लांबविली
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}