शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

रुग्ण वाहनात, डॉक्टर ढाब्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:22 IST

ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना त्वरित आणि वेळेवर आरोग्यसेवा मिळावी यासाठी १०८ ही आपात्कालीन रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आली आहे़

ठळक मुद्देआपातकालीन सेवा १०८ रुग्णवाहिकेत तासभर वेदनेने विव्हळली महिला

शिवराज बिचेवार।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना त्वरित आणि वेळेवर आरोग्यसेवा मिळावी यासाठी १०८ ही आपात्कालीन रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आली आहे़ या सेवेमध्ये एका तासाच्या आत संबंधित रुग्णाला घेवून निश्चित केलेल्या शासकीय रुग्णालयात दाखल करणे बंधनकारक आहे़ असे असताना तामसा येथील एका महिला रुग्णाला रुग्णवाहिकेतच ठेवून यातील डॉक्टर आणि चालकाने पाऊणतास एका ढाब्यावर ‘रश्श्यावर’ यथेच्छ ताव मारला़ यामुळे रुग्णाला अंधाऱ्या रात्री रुग्णवाहिकेतच वेदना सहन करीत ताटकळावे लागले़नांदेड जिल्ह्यात १०८ या आपात्कालीन सेवेच्या १६ रुग्णवाहिका धावतात़ आजपर्यंत या रुग्णवाहिकेतून हजारो रुग्णांना आरोग्यसेवा मिळाली आहे़ त्यातून अनेकांचे प्राणही वाचले आहेत़ परंतु काहीवेळा या रुग्णवाहिकेतील डॉक्टर आणि चालकांच्या भूमिकेमुळे ही चांगली सेवा बदनाम होत आहे़ असाच काहीसा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला़तामसा येथील एका महिलेला उपचारासाठी हदगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ यावेळी हदगाव येथील डॉक्टरांनी महिलेला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्याचा सल्ला दिला़ त्यानंतर १०८ या रुग्णवाहिकेशी संपर्क करण्यात आला़थोड्याच वेळात (एम़एच़१४, सीएल १२५२) या क्रमांकाची रुग्णवाहिका तेथे आली़ या रुग्णवाहिकेतून महिलेला नांदेडकडे आणत असताना अंधार पडला होता़ यावेळी चालकाने रस्त्याच्या कडेला ही रुग्णवाहिका उभी करुन डॉक्टरसोबत एका ढाब्यावरील जेवणावर ताव मारत तृप्तीचा ढेकर दिला़ दरम्यान, तब्बल पाऊणतास मात्र महिला वेदनेने विव्हळत रुग्णवाहिकेतच होती़यावेळी महिलेसोबत त्यांचे पतीही होते़ एका तासाच्या आत रुग्णापर्यंत पोहोचल्यानंतर संबंधित रुग्णाला शासकीय रुग्णालयात दाखल करेपर्यंत ही रुग्णवाहिका कुठेच थांबवू नये असा नियम आहे़ असे असताना तब्बल पाऊणतास ही रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेलाच थांबविण्यात आली़रुग्णाची घेतली होती परवानगीयाबाबत १०८ या आपातकालीन रुग्णसेवेचे जिल्हा समन्वयक डॉ़सुनिल कुलकर्णी म्हणाले, रुग्णासोबत कुणीही नव्हते़ जवळ पैसे नसल्यामुळे त्यांनी गावाकडून कुणी व्यक्ती पैसे घेवून येईपर्यंत रुग्णवाहिका थांबविण्याची विनंती केली होती़ विनाकारण अशाप्रकारे आम्ही रुग्णवाहिका थांबवत नाही़ त्यात डॉक्टर आणि चालक सकाळपासून उपाशीच होते़ त्यामुळे रुग्णाची परवानगी घेवून ते जेवणासाठी गेले होते़डॉक्टर फ्रंट सिटवरच !१०८ या रुग्णवाहिकेत एकदा रुग्णाला घेतल्यानंतर डॉक्टरांनी त्यावर प्रथमोपचार करणे आवश्यक असते़ त्यानंतर रुग्णवाहिकेचा प्रवास सुरु असताना डॉक्टर हे रुग्णाजवळ मागील सिटवरच असणे आवश्यक आहे़परंतु, अनेक रुग्णवाहिकांमध्ये रुग्णाला मागील सिटवर सोडून डॉक्टर चालकासोबत फ्रंट सिटवर बसत आहेत़ त्यामुळे रुग्णाची प्रकृती कशी आहे ? याबाबत डॉक्टर मंडळीकडून बेफिकरपणा करण्यात येत असल्याचे दिसून येते़

टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर