शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

'मनोज जरांगे यांना दिल्ली नाही, थेट अमेरिकेलाच पाठवा'! लक्ष्मण हाके यांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 19:15 IST

‘झुंड गोळा करून महाराष्ट्र सरकारवर दबाव टाकायचा आणि जीआर काढायला लावायचा, हा प्रकार सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारा आहे.

नांदेड : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा वातावरण तापले असून, मनोज जरांगे-पाटील यांच्या दिल्ली जाण्याच्या इशाऱ्यावर ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘जरांगे यांनी दिल्ली नव्हे तर अमेरिकेलाच जावे, सरकारने त्यांना तिथे नोकरी शोधून द्यावी आणि दोन-तीन वर्षे तिकडेच ठेवावे,’ अशी उपरोधिक मागणी करत हाके यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर टीका केली.

नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असता प्रा. हाके यांनी सिडको परिसरात एका कार्यकर्त्याच्या घरी भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. हाके म्हणाले, ‘झुंड गोळा करून महाराष्ट्र सरकारवर दबाव टाकायचा आणि जीआर काढायला लावायचा, हा प्रकार सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारा आहे. गावागावांत ओबीसी आणि मराठा समाजामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. जरांगे यांच्या आंदोलनामुळे ओबीसींच्या अन्नात माती कालवली जात आहे. हे थांबायला हवे. हैदराबाद गॅझेट जर मराठा समाजासाठी लागू होऊ शकते, तर बंजारा समाजालाही आरक्षण मिळायला हवे,’ असेही प्रा. हाके म्हणाले.

न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यभर गावागावात उसळलेल्या ओबीसी–मराठा संघर्षावरही प्रा. लक्ष्मण हाके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “जोपर्यंत सरकारचा विवादित जीआर मागे घेतला जात नाही, तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही.” हाके पुढे म्हणाले की, हैदराबाद गॅझेट मराठा समाजावर लागू होत असेल, तर त्याच न्यायाने बंजारा समाजालाही आरक्षणाचा लाभ मिळायला हवा. त्यांनी स्पष्ट केले की या प्रश्नावर न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणlaxman hakeलक्ष्मण हाकेOBC Reservationओबीसी आरक्षण