शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

सेनेचा वाघ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:31 IST

केंद्रीय मंत्री आठवले हे मंगळवारी नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी आठवले म्हणाले, धनंजय मुंडे, संजय राठोड अशा प्रकरणांमुळे सरकारची ...

केंद्रीय मंत्री आठवले हे मंगळवारी नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी आठवले म्हणाले, धनंजय मुंडे, संजय राठोड अशा प्रकरणांमुळे सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात सखोल चौकशी होण्याची गरज आहे. त्यातून सत्य काय ते बाहेर येईल; परंतु अशा प्रकरणामुळे तीन पायांचे हे सरकार जास्त काळ टिकेल असे वाटत नाही. काँग्रेसनेही आता नाना पटोले यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला प्रदेशाध्यक्ष केले आहे. ते कुणालाही भीक घालणार नाहीत. सत्तेत जर काँग्रेसला न्याय मिळत नसेल तर त्यांनी लगेच बाहेर पडावे. या सरकारमधून सर्वप्रथम काँग्रेसच बाहेर पडेल अशी भविष्यवाणीही आठवले यांनी केली. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन थांबले पाहिजे. एवढे दिवस अशाप्रकारे आंदोलन करणे योग्य नाही. नामांतराच्या वेळी आम्हीही आंदोलन केले होते; परंतु काही वेळेला दोन पावले मागे आलो होतो. सरकार चर्चेसाठी तयार आहे; परंतु आंदोलकांचे नेते कायदाच मागे घेण्याच्या अटीवर ठाम आहेत. त्यामुळे हा कायदा मागे घेतल्यास अशाचप्रकारे इतर कायदे मागे घेण्याची मागणी जोर धरू शकते आणि लोकशाहीसाठी हे घातक असल्याचे ते म्हणाले.

चौकट-

आंबेडकरी राजकारणासाठी युती आवश्यकच

रिपब्लिकन ऐक्यासाठी सर्व नेते तयार होत नाहीत. मी बाळासाहेब आंबेडकरांना अनेक वेळा त्यासाठी साद घातली; परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. बाळासाहेबांचा वंचितचा प्रयोग चांगला होता. लोकसभेत त्यांना भरभरून मतेही मिळाली; परंतु लोकसभेत आणि विधानसभेत त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. एकूण राजकीय परिस्थिती पाहता स्वत:च्या ताकदीवर निवडून येणे शक्य नाही. त्यामुळे आंबेडकरी चळवळीला युती करूनच निवडणुका लढवाव्या लागतील. त्यासाठी नव्या पिढीने सकारात्मक राजकारण करण्याची गरज असल्याचेही आठवले यावेळी म्हणाले.