वाजेगावमध्ये सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:17 AM2021-03-06T04:17:37+5:302021-03-06T04:17:37+5:30

सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन हदगाव - तामसा येथील वाॅर्ड क्र. ५ मध्ये आ. माधवराव पाटील-जवळगावकर यांच्या विकास निधीतील सिमेंट रस्ता ...

Reception in Wajegaon | वाजेगावमध्ये सत्कार

वाजेगावमध्ये सत्कार

Next

सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

हदगाव - तामसा येथील वाॅर्ड क्र. ५ मध्ये आ. माधवराव पाटील-जवळगावकर यांच्या विकास निधीतील सिमेंट रस्ता कामाचे भूमिपूजन सरपंच बालाजी महाजन यांच्याहस्ते झाले. यावेळी मधुकरराव सरोदे, पं. स. सदस्य संदीप राठोड, विजय कौशल्य, ग्रामविकास अधिकारी आनंद शेळके, माधव नारेवाड, अशोक कोडगीरवार, सुभाष धरमुरे, शिवराज वारकड, निशाद पठाण, अजीज खोती आदी उपस्थित होते.

चौघांवर गुन्हा दाखल

देगलूर - तालुक्यातील पुंजरवाडी येथील एका ३२ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मरखेल पोलीस ठाण्यात चारजणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. याशिवाय पीडितेच्या पतीला आरोपींनी मारहाणही केली. तपास पोलीस उपनिरीक्षक अजीत बिरादार करीत आहेत.

विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद

हदगाव - तामसा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. यावेळी बारा प्रयोगांची मांडणी विद्यार्थ्यांनी केली. मुख्याध्यापक संभाजी वाठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक मधुकर बीडकर व सहशिक्षक दीपक निंभोरकर यांनी हा उपक्रम राबविला. यावेळी सहशिक्षिका शिल्पा भोसीकर, अर्चना साखरे, सहशिक्षक मारोती भुरके यांनी मार्गदर्शन केले.

थकित वेतनाची मागणी

नवीन नांदेड - मुजामपेठ येथील एका खासगी शाळेत सहशिक्षक पदावर असलेले बापूसाहेब पवार यांना वेतनवाढ देण्यात आली नाही. तसेच मासिक वेतनही अदा करण्यात आले नाही. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडने आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. निवेदनावर संकेत पाटील, सुभाष कोल्हे, कृृष्णा मोरे, राम आनकाडे, दीपक भरकड, गजानन शिंदे आदींची नावे आहेत.

आदिवासी पँथर संघटना

हदगाव - भारतीय आदिवासी पँथर संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी धनराज सोनटक्के, पारधी समाज आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक राठोड, तर आदिवासी पँथरच्या सर्कल प्रमुखपदी विठ्ठल धुमाळे यांची निवड झाली. संस्थापक-अध्यक्ष प्रशांत बोडके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन ही निवड करण्यात आली. यावेळी मधुकरराव सरोदे, हरिश्चंद्र गारोळे, मारोती खोकले, पिंटू मोरे आदी उपस्थित होते. धनराज सोनटक्के यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

येपूरवार यांचा सत्कार

कुंडलवाडी - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवपदी लक्ष्मीकांत येपूरवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल अडत व्यापारी सल्लागार समितीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालिका उपाध्यक्ष शैलेष ऱ्याकावार, सेना शहराध्यक्ष सोनू सब्बनवार, अशाेक पाटील, बालाजी पाटील, वैभव उपलंचवार, आशिष गुंडाळे, गणेश उत्तरवार, सतीश चाकटवार, किरण हुनगीलवार, महंमद अहमद शेख, बंटी धोतरे, संजीव पाटील आदी उपस्थित होते.

नागापूरची परिषद रद्द

भोकर - तालुक्यातील नागापूर येथे ८ मार्च रोजी बौद्ध धम्म परिषद घेण्यात येणार होती. मात्र कोरोनामुळे ही परिषद रद्द करण्यात आली. यानिमित्ताने प्राचार्य डॉ. संघमित्रा मांजरमकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच सत्यपाल महाराज यांच्या समाज प्रबोधनपर गायनाचा कार्यक्रम होणार होता, अशी माहिती नागापूरचे सरपंच दत्ता व्यवहारे व स्वागताध्यक्ष एल. ए. हिरे यांनी दिली.

तृप्ती रोकडे प्रथम

बिलोली - शंकरनगर येथील साईबाबा विद्यालयात महिला राजसत्ता आंदोलनाच्यावतीने नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत दहावीतील विद्यार्थिनी तृप्ती रोकडे हिने प्रथम क्रमांक मिळविला. ‘स्त्रीचे कुटुंबातील स्थान’ या विषयावर ही स्पर्धा होती.

परवाना निलंबित

मुक्रमाबाद - रावी येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला. या दुकानासंदर्भात अनेक तक्रारी होत्या. याशिवाय दुकानदाराने माहितीही व्यवस्थित ठेवलेली नव्हती. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Reception in Wajegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.