शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष बदलला, नेतृत्व कायम : नांदेडकरांची पुन्हा अशोकरावांना साथ, प्रथमच होणार भाजपचा महापौर

By श्रीनिवास भोसले | Updated: January 17, 2026 18:31 IST

भाजपमध्ये प्रवेशानंतर अशोकराव चव्हाण यांनी जुने काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजपचे निष्ठावंत यांची एकत्रित मोट बांधली.

- श्रीनिवास भोसले
नांदेड :
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचा 'हात' सोडून भाजपचे 'कमळ' हाती घेतल्याने नांदेडच्या राजकारणात खळबळ उडाली होती. ‘नेतृत्व बदलेल का, की जनता पक्षनिष्ठ राहील?’ असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, त्यानंतर झालेल्या विविध निवडणुकांच्या निकालांनीच त्याचे उत्तर दिले. पक्ष बदलला असला, तरी नेतृत्व तेच या भावनेतून नांदेडकरांनी पुन्हा एकदा अशोकराव चव्हाण यांनाच साथ दिली आहे.

अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आजवर काँग्रेसचा वरचष्मा राहिला. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभा निवडणुकांपर्यंत चव्हाण यांचे नेतृत्व निर्णायक ठरले. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने आणि काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून अशोकरावांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या निर्णयावर सुरुवातीला टीका झाली; मात्र, विधानसभा, नगरपालिका, नगरपंचायत आणि आता महापालिका निवडणूक निकालांनी अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब केले आहे.

भाजपमध्ये प्रवेशानंतर अशोकराव चव्हाण यांनी जुने काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजपचे निष्ठावंत यांची एकत्रित मोट बांधली. खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्यासह काही जुन्या भाजप पदाधिकाऱ्यांनीही अशोकरावांचे नेतृत्व मान्य करत एकत्र काम केले. याचा परिणाम म्हणून नांदेड जिल्ह्यात भाजप प्रथमच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा शंभर टक्के स्ट्राइक रेट राहिला. त्यानंतर झालेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्येही भाजपने बाजी मारली. जिल्ह्यातील विविध नगरपालिकांमध्ये भाजपचे सर्वाधिक ७४ नगरसेवक निवडून आले. याशिवाय, अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देणाऱ्या मराठवाडा जनहित पार्टीचे ३३ नगरसेवक निवडून येणे हे त्यांच्याच प्रभावाचे द्योतक ठरले. भोकर, मुदखेड, कुंडलवाडी येथे भाजपला, तर बिलोली व धर्माबाद येथे स्थानिक विकास आघाडीला नगराध्यक्षपदावर यश मिळाले.

महापालिकेवर भाजपचे कमळ फुलले
आठ वर्षांनंतर झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळणार की नाही, याबाबत तर्कवितर्क काढले जात होते. परंतु, नांदेड शहरात राहणाऱ्या जनतेनेदेखील अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपला साथ दिली. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे स्पष्ट बहुमत आले. यापूर्वी अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात सर्वाधिक काळ मनपा काँग्रेसची सत्ता राहिली आहे. आजघडीला एकूण ८१ पैकी भाजपाला ४५ जागांवर यश मिळाले. त्याचबरोबर एमआयएमला १४, काँग्रेस - १०, शिंदेसेना - ४, वंचित बहुजन आघाडी ५, राष्ट्रवादी (अजित पवार) २ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे.

असा राहिला पक्षनिहाय स्ट्राईकरेट
भाजपने एकूण ६६ उमेदवार रिंगणात उतरविले होते. त्यापैकी ४५ जणांना यश मिळाले. राष्ट्रवादी ५३ पैकी २, काँग्रेस ५४ पैकी १०, वंचित बहुजन आघाडी १८ पैकी ५, एमआयएमचे ३७ पैकी १४ तर शिंदे सेनेच्या ६३ पैकी ४ उमेदवारांचा विजय झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Party Changed, Leadership Remains: Nanded Supports Ashok Chavan, BJP Mayor First Time

Web Summary : Despite joining BJP, Ashok Chavan retains Nanded's support. BJP becomes largest party, securing its first mayoral position after local elections affirmed Chavan's leadership.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Nanded Waghala Municipal Corporation Electionनांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपा