शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड मनपावर ‘कमळ’ फुलले; काँग्रेसच्या हाताने ताकद दाखविली, शिंदेसेनेला अनपेक्षित धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 19:12 IST

मतदारांनी नांदेडमध्ये पुन्हा अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत केवळ ‘कमळ’ पाहून मतदान केले.

नांदेड : नांदेड अन् अशोकराव चव्हाण हे समीकरण पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी भाजप प्रवेशानंतर जुन्या-नव्याचा समेट घडून आणत खासदार डाॅ. अजित गोपछडेंसह काही पदाधिकाऱ्यांना सोबत घेत महापालिका निवडणुकीची रणनीती आखली. त्यात मॅनेजमेंट गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चव्हाणांनी प्रभागाची रचना ते उमेदवारांची निवड, जातीय समीकरणे जुळवत दिलेली लढत पूर्णपणे यशस्वी झाली असून ८१ पैकी तब्बल एकूण ४५ जागांवर भाजपने यश मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

राज्यात भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे महापालिकेत युती होईल, असे बोलले जात होते. मात्र, पूर्वीपासूनच स्थानिक नेतृत्वांनी स्वतंत्र लढण्याचा वारंवार उल्लेख केला आणि शेवटच्या टप्प्यात युतीदेखील तुटली. त्यातून भाजपने स्वतंत्र उमेदवार देत अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात ताकदीनिशी लढत दिली आणि एकतर्फी विजय मिळविला. दुसरीकडे, शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि नेतृत्वाच्या अभावाचा फटका बसला.

नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघावर शिंदेसेनेचे वर्चस्व असल्याने शहरात नांदेडकर मतदार आम्हालाच साथ देतील, हा शिंदेसेनेच्या आमदारांचा दावा फेल ठरला आहे. युतीमध्ये भाजपकडून आठ ते दहा जागा देण्याचे मान्य केले गेले होते; परंतु, शिंदेसेनेच्या आमदारांना अधिक जागा हव्या होत्या. त्यात त्यांनी केलेल्या विकासकामांचा आत्मविश्वास होता; मात्र हा आत्मविश्वासच त्यांना नडला. मतदारांनी नांदेडमध्ये पुन्हा अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत केवळ ‘कमळ’ पाहून मतदान केले. त्यात जुन्या-नव्याच्या वादात राज्यसभा सदस्य डाॅ. अजित गोपछडे आणि काही जुन्या पदाधिकाऱ्यांनी अशोकरावांचे नेतृत्व मान्य करत त्यांना खंबीरपणे साथ दिली. त्याचाही फायदा भाजपला झाला आणि नांदेड महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला.

आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या नेतृत्वात लढलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला खातेदेखील उघडला आले नाही. अर्ध्या नांदेडमध्ये शिंदेसेना आणि राष्ट्रवादीची युती, त्यातही काही जागांवर आमनेसामने आणि उत्तरमध्ये स्वतंत्र उमेदवार हे गणित नांदेडकरांना पटले नाही.

शिंदेसेनेचे दोन आमदार आणि एक विधानपरिषद सदस्य असताना त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. आमदार हेमंत पाटील यांचे दक्षिणमधील ‘मॅनेजमेंट’ चुकले अन् आमदार आनंद बोंढारकर यांचाही प्रभाव पडला नाही; तर नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये आमदार बालाजीराव कल्याणकर यांना त्यांनी केलेल्या कामांचा अतिविश्वास नडला. त्या तुलनेत काँग्रेस आणि एमआयएमची कामगिरी चांगली राहिली आहे. वंचित बहुजन आघाडीनेही नांदेड महापालिकेत एंट्री केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Victorious in Nanded Municipal Corporation; Congress Shows Strength.

Web Summary : Ashok Chavan's strategy led BJP to victory in Nanded, securing 45 out of 81 seats. Internal conflicts hurt Shinde's Sena. Voters favored BJP's 'Lotus' symbol, marking BJP's first triumph in Nanded's municipal history. Congress and MIM performed well.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाBJPभाजपाAshok Chavanअशोक चव्हाण