शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात रेमडेसिविरचा पुरवठा विस्कळीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:18 IST

नांदेड- गंभीर संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात येते. मागील काही दिवसांपासून या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली ...

नांदेड- गंभीर संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात येते. मागील काही दिवसांपासून या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मात्र, तरीही पुरवठा सुरळीत झालेला नाही. १ ते ९ मे या कालावधीसाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांना ८९ हजार १२७ इंजेक्शन देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, केवळ ५० हजार ४९५ इंजेक्शन मिळणार आहेत. रेमडेसिविर विषाणूवर मात करणारे ॲन्टीव्हायरल औषध आहे. इबोला या साथीच्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी ते विकसित करण्यात आले होते. तेच इंजेक्शन आता कोरोनाचा गंभीर संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येते. कोरोनाबाधिताच्या फुफ्फुसाला संसर्ग होतो. एचआरसीटी चाचणीत हा स्कोअर ९ च्या पुढे गेल्यानंतर तसेच रुग्णाचा ताप आटोक्यात येत नसेल तर रेमडेसिविर दिले जाते. सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेने कोविड उपचारासाठी या इंजेक्शनची शिफारस केली होती. त्यानुसार ३० जून २०२० पासून हे इंजेक्शन महाराष्ट्रात वापरण्यात येऊ लागले. राज्य शासनाने १४०० रुपयांपेक्षा अधिक पैसे या इंजेक्शनसाठी देऊ नका असे स्पष्ट सांगितले असले तरी मागणी आणि पुरवठा यातील तफावतीमुळे या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असून अगदी २० ते ४० हजारालाही इंजेक्शन खरेदी करणारे अनेकजण भेटतात. मध्यंतरीच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेने रेमडिसिवर कोरोनाच्या उपचारातून काढून टाकले मात्र त्यानंतरही या इंजेक्शनची मागणी कायम आहे.

२१ ते ३० एप्रिल या कालावधीसाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांना ५५ हजार २४१ इंजेक्शनचा पुरवठा करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले हाेते. मात्र, या कालावधीत केवळ ४१ हजार ७३७ इंजेक्शनचा पुरवठा झाला. त्यानंतर काही जिल्ह्यांतून इंजेक्शनची मागणी वाढल्यानंतर जिल्हानिहाय पुरवठ्याचे नियोजन बदलण्यात आले. आता १ ते ९ मे या कालावधीसाठी मराठवाड्याला ८९ हजार १२७ इंजेक्शन देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, याही वेळी इंजेक्शनचा पुरवठा कमी होण्याची शक्यता असून ९ मेपर्यंत ५० हजार ४९५ इंजेक्शन देण्याचे आरोग्य विभागाने निश्चित केले आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस इंजेक्शनचा तुटवडा कायम राहण्याचीच शक्यता आहे.

कोट........

राज्य शासनाने जिल्हानिहाय इंजेक्शनचा कोटा ठरविलेला आहे. मध्यंतरीच्या काळात मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत होती. मात्र आता काहीशी परिस्थिती सुधारल्याचे दिसत आहे. मात्र, तरीही मागणीपेक्षा कमी इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. डॉक्टरांनी गरज असेल तरच या इंजेक्शनचा वापर करायला हवा, एचआरसीटी स्कोअर ९ पेक्षा असेल तर हे इंजेक्शन रुग्णाला देण्याची गरज नाही.

- डॉ. विपीन इटणकर, जिल्हाधिकारी, नांदेड