शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत खासदार, आमदारांनी कार्यकर्त्यांना सोडले वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:18 IST

उमरी : तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने खासदार तसेच आमदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार व प्रमुख कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडल्याचे ...

उमरी : तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने खासदार तसेच आमदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार व प्रमुख कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडल्याचे दिसून येत आहे.

उमरी तालुक्यात ५७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून, कोरोना साथरोगानंतर आता आर्थिक अडचणीत सापडलेल्या कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत निवडणुकांना सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत अनेक कार्यकर्ते आमदार, खासदार व माजी आमदार यांच्या भेटीसाठी त्यांच्या कार्यालयाभोवती घिरट्या घालत आहेत. मात्र, सध्या कोणतेही लोकप्रतिनिधी तसेच नेते या कार्यकर्त्यांना भेटत नसल्याचे विदारक चित्र आहे. ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करणे, उमेदवारांची निश्चिती, प्रचार यंत्रणा, उमेदवारी अर्ज भरणे आदी प्रक्रियेसाठी, सल्लामसलतीसाठी तसेच आमदार-खासदारांचे मार्गदर्शन घेण्यासाठी अनेक कार्यकर्ते आतुर झाले आहेत. अशा परिस्थितीत या कार्यकर्त्यांना मात्र कोणीही थारा देत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लोकसभा - विधानसभा निवडणुकीमध्ये हेच सामान्य कार्यकर्ते नेत्यांच्या निवडीसाठी अहोरात्र प्रचार करत होते. मात्र, आता ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्ताने याच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कोणीही वाली नाही. ‘गरज सरो... वैद्य मरो’ या उक्तीप्रमाणे ग्रामीण भागातील या कार्यकर्त्यांची कुणी साधी चौकशीही करत नाहीत वा जवळही घेत नाहीत. सध्या कुणीही सहकार्य करत नसल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.