शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी नदी संकटात; प्रदूषण, वाळू उपसा, खंडित प्रवाहामुळे मराठवाड्यावर पाणीटंचाईचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 19:42 IST

मराठवाड्याची जीवनवाहिनी धोक्यात! नाल्यांचे सांडपाणी थेट गोदावरीत; पीआरसी कमिटीच्या फटकाऱ्यानंतर नांदेड पालिकेला जाग

- अविनाश चमकुरेनांदेड : दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी आज गंभीर संकटाचा सामना करत आहे. सुमारे १६४५ किलोमीटर लांबीची ही नदी त्र्यंबकेश्वर येथे उगम पावून महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मार्गे अंतर्वेदी डेल्टा येथून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. पैकी ६०० किलोमीटरच्या राज्यातील प्रवासात ती लाखो हेक्टर शेतीला पाणी पुरवते, औद्योगिक विकासाला चालना देते आणि अनेक शहरांची तहान भागवते. दुष्काळी मानल्या जाणाऱ्या मराठवाड्यासाठी तर ही जीवनवाहिनीच ठरली आहे. मात्र, बेसुमार वाळू उपसा, नदीपात्रात नाल्यांचे थेट विसर्जन यामुळे गोदावरीचा नैसर्गिक प्रवाह खंडित झाला असून मराठवाड्यावर भीषण पाणीटंचाईचे सावट आहे.

गोदावरी नदीपात्रात नाशिक ते धर्माबादपर्यंत लहानमोठे ३०० पेक्षा जास्त बंधारे घातलेले आहेत. याशिवाय गंगापूर धरण, कोपरगाव येथील नांदूर मधमेश्वर बंधारा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे जायकवाडी धरण, त्याशिवाय नांदेड येथे ८० दलघमी क्षमतेचे विष्णुपुरी धरण यांसारख्या प्रकल्पांमुळे जलसाठा निर्माण होऊन शेती, पाणीपुरवठा आणि औद्योगिक गरजा पूर्ण होत असल्या तरी अनियंत्रित मानवी हस्तक्षेपामुळे नदीची वहनक्षमता आणि नैसर्गिक संतुलन धोक्यात आले आहे.

विशेषतः मराठवाड्यात नदीपात्रातील प्रदूषणामुळे पाणी वापर अयोग्य होत असून भविष्यात तीव्र पाणीटंचाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, वाळू उपशावर नियंत्रण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी आणि नदीजोड प्रकल्पांचा शाश्वत विचार याशिवाय पर्याय नाही. काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यात दाखल झालेल्या पीआरसी कमिटीतील आमदारांनी गोदावरीची शहरात झालेली दुरवस्था पाहून जिल्हा प्रशासनासह महापालिकेतील अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. त्यानंतर खडबडून जागी झालेल्या महापालिकेने गोदावरी शुद्धीकरणासाठी १०० दिवसांचा कृती कार्यक्रम आखला असून त्याअंतर्गत दाखवण्यासाठी का होईना काही प्रमाणात कामे सुरू केली आहेत.

नदीजोड प्रकल्पासाठी साडेतेरा हजार कोटींची तरतूदमराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांचे अतिरिक्त पाणी वाहून आणण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबविण्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. त्यासाठी जवळपास साडतेरा हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही अर्थसंकल्प सादर करतेवेळी सांगण्यात आले. मात्र, पावसाळ्यात गोदावरीसह राज्यातील अन्य नद्यांनादेखील मुबलक पाणी असते. मात्र, त्याची साठवण करण्यासाठी वेगळी तरतूद नसल्याने हे पाणी आले तसेच समुद्राकडे वाहते होते. नदीजोड प्रकल्पामुळे अनेक नवीन भागात पाण्याचे प्रवाह होतील. ही बाब स्वागतार्ह असली तरी कृती कार्यक्रम राबविताना आपल्याकडील नद्यांचे अतिरिक्त पाणी पुरात वाहू न देता त्याची साठवण केल्यास कधीच पाणीटंचाई भासणार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Godavari River Crisis: Pollution, Sand Mining Threaten Marathwada Water Supply

Web Summary : The Godavari River faces severe threats from pollution and excessive sand mining, disrupting its flow. This endangers Marathwada's water supply, demanding urgent action like wastewater treatment and regulated sand extraction to ensure its sustainability.
टॅग्स :godavariगोदावरीMarathwadaमराठवाडाNandedनांदेडWaterपाणी