स्वाधार योजनेची दुसऱ्या हप्त्याची रक्कम जमा करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST2021-06-04T04:15:03+5:302021-06-04T04:15:03+5:30

यामध्ये विशेषतः जे बाहेरगावी विद्यार्थी होते व ज्यांना शिक्षणासाठी घरून मदत होत होती या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे ...

Demand for deposit of second installment of Swadhar Yojana | स्वाधार योजनेची दुसऱ्या हप्त्याची रक्कम जमा करण्याची मागणी

स्वाधार योजनेची दुसऱ्या हप्त्याची रक्कम जमा करण्याची मागणी

यामध्ये विशेषतः जे बाहेरगावी विद्यार्थी होते व ज्यांना शिक्षणासाठी घरून मदत होत होती या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे . तसेच नवीन शैक्षणिक वर्ष सुरुवात होऊन बराच कालावधी झालेला आहे, यामुळे विद्यार्थी हा अडचणीत सापडला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ काही प्रमाणात विद्यार्थ्यांना मिळाला आहे तर अनेक विद्यार्थी या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. या योजनेबद्दल वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा अनेक विद्यार्थ्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात येत आहे. येत्या दहा दिवसात जर विद्यार्थ्यांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झाले नाहीत, तर पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. या मागणीचे निवेदन वंचित बहुजन युवा आघाडीचे शुद्धोधन कापसीकर, वैभव लष्करे, यशवंत गोणारकर यांच्या वतीने समाजकल्याण आयुक्त माळवतकर यांना देण्यात आले.

Web Title: Demand for deposit of second installment of Swadhar Yojana