शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सून जेवायला देत नाही, मुलगाही दुर्लक्ष करतो; उणीदुणी नियंत्रण कक्षात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:18 IST

नांदेड : आजकाल एकत्र कुटुंब पद्धती मोडीत निघत आहे. पती-पत्नी आणि मुले-मुली एवढेच सदस्य घरात असावेत, यासाठी अनेकांचा अट्टाहास ...

नांदेड : आजकाल एकत्र कुटुंब पद्धती मोडीत निघत आहे. पती-पत्नी आणि मुले-मुली एवढेच सदस्य घरात असावेत, यासाठी अनेकांचा अट्टाहास असतो. त्यामुळे घरात असलेली वृद्ध मंडळी त्यांच्या दृष्टीने एकप्रकारचे ओझेच असते. त्यातून कुटुंबात कुरबुरी वाढतात. पिकलेल्या पानांच्या मानसिक स्थितीचा विचार न करता, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे वाईट वागणूक देण्यात येते. त्यातून अनेक प्रकरणे ही पोलिसांपर्यंत पोहोचतात.

नांदेड जिल्ह्यात महिला सहाय्य कक्षात असलेल्या वृद्धांसाठीच्या १०९० हेल्पलाईनवर २२ वृद्धांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यातील सर्वाधिक तक्रारी या सूनेकडून होणाऱ्या त्रासाच्या आहेत तर क्रमांक दोनवर मुलांकडून होणाऱ्या छळाच्या आहेत. सून जेवायला देत नाही, मुलगा औषधपाणी करत नाही, संपत्ती नावावर करुन देण्यासाठी त्रास देतो अशाप्रकारच्या तक्रारी वृद्धांनी केल्या आहेत. दरम्यान, वृद्धांनी तक्रार केल्यानंतर महिला सहाय्य कक्षात दोघांनाही बोलावून घेण्यात येते. याठिकाणी त्यांचे समुपदेशन केले जाते. तसेच गरज पडल्यास वृद्धांना कायदेशीर सल्लाही देण्यात येतो. महिला सहाय्य कक्षाने आजपर्यंत अशाप्रकारे अनेक कुटुंबातील कलहावर तोडगा काढला आहे.

२२ तक्रारींचा केला निपटारा

महिला सहाय्य कक्षात ज्येष्ठ नागरिकांकडून वर्षभरात तब्बल २२ तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारीनंतर याठिकाणी तक्रारकर्ता वृद्ध आणि ज्याच्याविरोधात त्यांची तक्रार आहे अशा दोघांनाही बोलावण्यात येते. सुरुवातीला दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात येते, त्यानंतर वृद्धाला त्रास देत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित मुलाला तसे न करण्याबाबत समज दिली जाते. तसेच कायदेशीर कारवाईची माहितीही दिली जाते. अशाप्रकारे जवळपास २२ तक्रारींचा याठिकाणी निपटारा करण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नांदेडमध्ये ज्येष्ठांच्या तक्रारींचे प्रमाण कमीच आहे.