शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : उमरीत आलेला हैदराबाद येथील हॉटेल कर्मचारी कोरोना संशयित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 15:35 IST

उपचार सुरु असून त्याची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

उमरी : कोरोना संशयित रुग्ण उमरीच्या  ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला असून त्याच्यावर  आयसोलेशन वॉर्डामध्ये उपचार चालू आहेत. हैदराबाद येथील एका नामांकित हॉटेलमध्ये परदेशी पर्यटकांशी त्याचा संपर्क आला होता. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

तालुक्यातील एक २० वर्षे तरुण हैदराबाद येथे एका नामांकित हॉटेलमध्ये  कर्मचारी म्हणून काम करतो.  शुक्रवारी सायंकाळी देवगिरी एक्स्प्रेसने तो उमरीत आला. प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने तो स्वत:च थेट उमरीच्या  ग्रामीण रुग्णालयात  दाखल झाला. यावेळी वैद्यकीय अधिकारी  डॉ.  माधव विभुते यांनी त्याच्यावर  उपचार केले . आज सकाळी अधिक्षक  डॉ. शंकर चव्हाण व डॉ.  आशिष कदम यांनी त्याचेवर  उपचार केले . सध्या या तरुणाची प्रकृती चांगली असून त्याच्यावर योग्य ते उपचार करण्यात येत आहेत.  कोरोनासंबंधित लक्षणे व त्याचा  हैदराबाद येथील हॉटेलमध्ये परदेशी पर्यटकांशी  आलेला संपर्क यामुळे डॉक्टरांनी त्यास निगराणीखाली ठेवले आहे.  आज शनिवारी  या रुग्णाचे रक्त व    लाळेचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत . त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील उपचारासाठी  निर्णय घेण्यात येईल . अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ . शंकर चव्हाण यांनी दिली.  उमरी  शहरातील नागरिकांनी कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये . वैयक्तिक स्वच्छता बाळगावी व गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये शक्यतो प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरातच राहावे . कुणालाही काही आजार जाणवल्यास लगेच ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र सरकारी दवाखान्यात दाखल होऊन उपचार करून घ्यावा.   असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड