शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज अखेर वैध; जाणून घ्या कोणते होते आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 19:15 IST

दाखल झालेले तीनही आक्षेप फेटाळल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे़

नांदेड : काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज अखेर वैध ठरला आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत दाखल झालेले तीनही आक्षेप फेटाळल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे़ दुपारी सुनावणी झाल्यानंतर रात्री ९.३० वाजता निकाल देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. रात्री पुन्हा अर्ध्या तासाने वेळ वाढविण्यात आली. अखेर रात्री १०.४५ वाजता निकाल देण्यात आला. चव्हाण यांची बाजू अ‍ॅड. पी.एस. भक्कड, तर आक्षेपकर्त्याची बाजू अ‍ॅड. सोनारीकर यांनी मांडली.  

आक्षेप आणि स्पष्टीकरण1.काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप दाखल करताना बहुजन महापार्टीचे शेख अफजलोद्दीन यांनी चव्हाण यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती आणि २०१९ च्या प्रतिज्ञापत्रात तफावत असल्याचे सांगताना चव्हाण यांनी कुटुंबियांसोबत आर्थिक व्यवहाराची माहिती नसल्याचा आक्षेप नोंदविला होता. हा आक्षेप फेटाळून लावताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २०१४ मधील किसन काठोरे विरुद्ध अरुण सावंत यांच्या प्रकरणाचा संदर्भ दिला. 2.फॉर्म क्र. २६ ची माहिती भरताना चव्हाण यांनी त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांची अर्धवट माहिती सादर केल्याचा आक्षेप रवींद्र थोरात या अपक्ष उमेदवाराने घेतला होता. 3.तिसरा आक्षेप थोरात यांनीच घेताना चव्हाण यांच्याकडे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनची उज्ज्वल गॅस एजन्सी असून ते थेट शासनाचे लाभार्थी ठरत असल्याचा आक्षेप होता. हा आक्षेप फेटाळून लावताना शासनाच्या अखत्यारीत असलेले हे महामंडळ आहे. ते थेट शासन चालवत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हा तर विरोधकांचा कट

लोकशाही मार्गाने निवडणूक जिंकणे ही खरी प्रक्रिया आहे; परंतु न्यायालयीन व्यवस्थेत एखाद्याला गुंतवून ठेवणे व त्यातून जनाधार नसताना यश मिळविण्याचा काहींचा प्रयत्न होता़ असाच प्रकार काही वर्षांपूर्वीही विरोधकांनी अवलंबिला होता; परंतु त्यावेळीही ते अपयशी ठरले होते़ खोडसाळपणामुळे सत्य झाकले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया निकालानंतर खा़ अशोक चव्हाण यांनी दिली़ 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNandedनांदेडcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण